Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

मंगळवार, 30 सप्टेंबर 2025. अश्विन शुक्ल अष्टमी

राहू काळ – दुपारी 3 ते 4:30

आज चांगला दिवस आहे. दुर्गाष्टमी महाष्टमी उपवास.
आज जन्मलेल्या बाळाची रास धनु.

30 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रात तुम्ही चमकता.शांत व प्रामाणिक आहात.स्वभाव अस्वस्थ असतो. तुमच्याकडे महत्वकांक्षी, अभिमान व तपस्या आहे.धर्मादाय संस्था, मुकबधीर, अपंग यांच्या साठी काम करण्याची आवड असते.आणि कोणत्या ही मोबदल्याची अपेक्षा नसते.वयाच्या 30 वर्षांनंतर भाग्योदय होतो.समाज प्रिय असून एकांकिका, सिनेमा,नाटके,प्रवास याची आवड असते.कला आणि संगीत यात गती असून घराची सजावट ही उत्तम रीतीने करता.
तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.

तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात. घराबद्दल आपलेपणा असतो, पण ओढ नसते. तुमची इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो परंतु कोणत्याही एका विषयात तुम्ही पारंगत होत नाही .स्वभाव लहरी असून मनाने हळवे असतात. पतीला सर्वतोपरी साथ देता आणि त्याच्या तुम्हाला अभिमान वाटतो .तुम्ही प्रेमळ, निष्ठावान असून उत्तम सह धर्मचारिणी असतात.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज
प्रेमीकाना यश.वाहन सौख्य लाभेल.नवीन खरेदी होईल.तीर्थयात्रा घडेल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.घरात इंटेरिअर वर खर्च होईल.स्त्रीधन वाढेल.सासर च्या नात्यातून लाभ होईल.सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.

मिथुन:-मैत्रिणींनो आज सप्तमस्थानी चंद्र आहे. पतीकडून भेटवस्तू मिळेल.मस्त दांडिया,गरबा वैगरे
मनोरंजक कार्यक्रमात सहभाग घ्याल.मस्त दांडिया,गरबा वैगरे तुमचे वर्चस्व वाढेल. विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.

कर्क:- मैत्रिणींनो आज कामाच्या ठिकाणी तणाव राहील पण सहकारी साथ देतील.गोड बोलण्याचे लाभ मिळतील.हाताखालिल कामगार मदत करतील.

सिंह:- मैत्रिणींनो आज चंद्र पंचमात आहे. रोमॅण्टिक दिवस अनुभवास येईल.आवडत्या व्यक्ती सोबत मजेत वेळ व्यतित कराल.मन आनंदी राहील.अकल्पित लाभ होतील.प्रेमात यश,विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता.

कन्या:- मैत्रिणींनो आज मनपसंत वस्तूची खरेदी होईल.शत्रू ला मात द्याल.घरगूती महत्वाच्या वस्तूची खरेदी होईल.नवीन ओळखीतून लाभ होईल.

तुळ:- मैत्रिणींनो आज तृतीय स्थानी चंद्र आहे. कलाकौशल्य दिसून येईल.व्यवसायात नवीन अभिनव कल्पना राबवाल.त्याचे कौतुक होईल.भावंडाशी संपर्क होईल.

वृश्चिक:-मैत्रिणींनो आज वाहन खरेदी होऊ शकते. अत्तर, सौदर्य प्रसाधने खरेदी कराल.छान सुग्रास भोजनाचा लाभ होऊ शकतो.तुमच्या गोड बोलण्याने इतरांच्या वर प्रभाव पडेल.

धनु:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.स्वतःसाठी खर्च कराल.नवीन वस्त्र खरेदि होईल.परदेशात प्रवासाचे बेत आखले जातील.मनातल्या इच्छा पूर्ण होतील.

मकर:-मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.अनपेक्षित लाभ होतील.लॉटरी लागण्याचे योग आहेत.

कुंभ:- मैत्रिणींनो आज लाभात चंद्र आहे.आवडत्या व्यक्ती भेटतील.मैत्र परिवाराशी भेट घडेल.अतिशय छान काळ आहे,झटपट कामाला लागा.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.सामजिक प्रतिष्ठा वाढेल.

मीन:- मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील.महिला सहकारी सहकार्य करतील.कला, सिनेमा क्षेत्रात उत्तम कामगिरी करा.

RELATED ARTICLES

Most Popular