लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
सोमवार, 29 सप्टेंबर 2025*. भाद्रपद शुक्ल /सप्तमी/अष्टमी
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
आज संध्याकाळी 5 वा पर्यंत चांगला दिवस आहे” महालक्ष्मी पूजन घागरी फुंकणे
आज जन्मलेल्या बाळाची रास धनू (विष्टी करण, नक्षत्र गंडात शांती).
(आज जन्मलेल्या बाळाची विष्टी करण शांती करून घ्यावी)
29 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. अभ्यासू वृत्ती असून दुसऱ्याला शिकवणे आवडते.व्यक्ती मत्व विरोधाभासी असते.।इतरांना मदत करताना घाईघाईने निर्णय घेता.यशस्वी होण्यासाठी सावधगिरी ने वागता.जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक आणि काहीसा स्वार्थी दृष्टीकोन असतो.विवाह श्रीमंत व्यक्ती शी होतो.आणि विवाहानंतर भाग्योदय होतो.उच्च पदस्थ व्यक्ती कडून मदत मिळण्याबाबत नशीबवान असता. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू आणि शांत असतात, मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात. वयाच्या 38 व्या वर्षानंतर आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होतात. खर्चिक स्वभावापासून प्रिय व्यक्तीसाठी खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात हुशार ,हरहुन्नरी आणि कर्तुत्ववान असून पतीशी जुळवून घेतात .समाज प्रियतेमुळे घरी येणारे जाणारे बरेच असतात. घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींना यशस्वी तोंड देता. विनोदी स्वभाव व वाकचतुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.लक्ष्मी प्रसन्न राहील.पर्स भरलेली राहील.अध्यात्मिक लाभ होतील.
वृषभ:-मैत्रिणींनो आज मन द्विधा अवस्थेत राहील.आरोग्य चांगले राहील.महत्वाचे निर्णय आज नकोत.
मिथुन:- मैत्रिणींनो आज तुमचे वर्चस्व राहील.अंदाज अचूक ठरतील.कामात व्यस्त रहाल.
कर्क:-मैत्रिणींनो आज बागकामासाठी वेळ द्याल.पाण्याजवळ भाग्योदय होईल.दानधर्म कराल.
सिंह:- मैत्रिणींनो आज भावंडांची साथ मिळेल.तुमच्या पासुन नातेवाईकांना फायदा होईल.सहल घडेल.
कन्या:- मैत्रिणींनो आज अति तेथे माती हे लक्षात ठेवा.कटू बोलणे टाळा.घसा संभाळा.
सार्वजनिक ठिकाणी बोलताना जपून .
तुळ:-मैत्रिणींनो आज आत्मविश्वास वाढेल.काही बाबतीत कठोर वागावे लागेल.सहकार्यांना दुखवू नका.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज कडक वागण्यामधून लाभ होतील.कौटुंबिक बाबतीत निराशा पदरी पडेल.
धनु:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.प्रतिस्पर्धी माघार घेतील.कामात व्यस्त रहाल.
मकर:- मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.जोडीदार खुश असेल.कामात मग्न रहाल. तरी घरातून काहीसा विरोध होईल.
कुंभ:-मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक लाभ होतील.दूरचे प्रवास ठरतील. मोठे व्यवहार होऊ शकतात. लाभात चन्द्र अनुकुल आहे.चुटकीसरशी कामे होतील.
मीन:- मैत्रिणींनो आज मनातल्या इच्छा पूर्ण होतील. लॉटरी मध्ये नशीब अजमाण्यास हरकत नाही.स्रीधन वाढेल.हितशत्रूं चा त्रास जाणवे