Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

शनिवार, 27 सप्टेंबर 2025. अश्विन शुक्ल पंचमी/षष्ठी

राहू काळ – सकाळी 9 ते 10:30

आज चांगला दिवस आहे. आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक

27 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. भरपूर आत्मविश्वास असून दुर्दैवी व पंगत्व आलेल्या लोकांना मदत करायला आवडते. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असतं. तुम्ही भावनाप्रधान व लहरी असल्यामुळे तुमची कृती व चाल अनाकलनीय असते. स्वतःच्या विचारांबद्दल दुराग्रही असतात. मानापमानाच्या विलक्षण कल्पना असून छोट्या छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होता .तुमच्या घमेंडखोर व उद्धट वृत्तीमुळे मित्रपरिवार छोटा असतो. तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. तुमचे विचार ठाम असतात आणि त्यात नैतिकता असते. तुम्हाला तुमचे कुटुंब प्रिय असते आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आहात आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुम्ही पोकळ दिमाख, गर्व, अहंकार, खोटा अभिमान टाळला पाहिजे तसेच इतरांवर टीका करताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत. तुम्ही महत्त्वाकांशी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. आपल्या पतीला त्याचे व्यवसायात मदत करता,सोबत स्वतःचे हि व्यवसाय किंवा नोकरी करून उत्पन्नात वर घालता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्यामुळे सार्वजनिक जीवनात  यश मिळते. टाकते व स्वच्छता याकडे जातीने लक्ष देतात. स्वभाव तापट असूनही संयम दाखवता.पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान असता. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो .खर्चिक स्वभाव असून आवडत्या व्यक्तीसाठी पैसे खर्च करताना मागेपुढे पाहत  नाही .पैशामुळे जेवढी सुख उपभोक्ता येतील त्याचा आनंद लुटता.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज अनपेक्षित गोष्टी घडतील, मात्र त्यातून फायदाच होईल.वागण्यातून गैरसमज होणार नाही त्या कडे लक्ष द्या.पतीशी वाद टाळा.महत्वाची कामे आज नको.

वृषभ:- मैत्रिणींनो आज
परदेशी जाण्याच्या संधी चालून येतील. पतीसोबत आनंदी वेळ व्यतीत कराल.आजारपण अंगावर काढू नका,दगदग कमी करा.

मिथुन:-मैत्रिणींनो आज बौद्धिक चमक दिसेल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.कलाकारांना अपेक्षित लाभ होणार नाही.खाण्याची पथ्ये पाळा.

कर्क:-मैत्रिणींनो आज मन प्रसन्न राहील.चिंता दूर होईल.चीजवस्तू जपा.मोजके बोला.आवडत्या व्यक्ती भेटतील.

सिंह:- मैत्रिणींनो आज कल्पनाशक्ती चा उपयोग करून लाभ होईल.वारसाहक्काने लाभ मिळेल.सर्व कार्यात यश मिळेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज अत्यंत सुंदर दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मौजमजेसाठी खर्च होईल.मात्र बोलताना भान ठेवा.

तुळ:-मैत्रिणींनो आज कामात यश मिळेल. संभाषण कौशल्याने लाभ होईल.समस्येवर मात कराल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.स्वतःसाठी खर्च कराल.सरकार कडून लाभ होईल.

धनु:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. कामात व्यस्त रहाल.पतीची मर्जी राहील.अचानक खर्चाला सामोरे जावे लागू शकते.

मकर:- मैत्रिणींनो आज बेकायदेशीर कामे नकोत.सन्मार्गावर चाला. प्रवासाचे योग.बढती ची शक्यता.

कुंभ:- मैत्रिणींनो आज तुमच्या दशम स्थानी चंद्र आहे. मेहनतीच्या मानाने यश कमीच राहील.कौटुंबिक सौख्याचा दिवस.नोकरीच्या ठिकाणी सन्मान मिळेल.

मीन:- मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल.इतरांवर आपली मते लादू नका.मन आनंदी राहील.मोह टाळ

RELATED ARTICLES

Most Popular