Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर ारं

शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025. अश्विन शुक्ल चतुर्थी/पंचमी

राहू काळ – सकाळी 10:30 ते 12

ललिता पंचमी .
आज वर्ज्य दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ/दुपारी 3:24 नंतर वृश्चिक
(विष्काकुंभ योग, विष्टि करण शांती)

26 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर शनि आणि बुध आणि चन्द्र या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे चंचलपणा अस्वस्थपणा तुमच्यात बऱ्याच प्रमाणात असतो. नीटनेटकेपणा ,सौंदर्यप्रसाधने, घराची सजावट या गोष्टीची आवड असते. प्रवासाची आवड असते. मित्र-मैत्रिणींचा सहवास आवडतो. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आक्रमकता दाखवता. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून पैसे सहजपणे मिळतात. घराबद्दल व प्रयोजनाबद्दल तुम्हाला ओढ असते. मोठ्या महत्त्वाकांक्षी योजना पार पाडण्यात आनंद वाटतो. तुमच्यात उत्स्फूर्तपणा, उत्साह, जिवंतपणा असतो .तुम्ही जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात. कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो .घरातील लोकांना सांभाळून घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करीत असतात. लोकप्रिय त्यामुळे घरी येणारे जणांची संख्या बरीच असते. घर कामाचा कंटाळा असतो, दुसऱ्याकडून कामे करून घेण्यात कुशल असतात. आयुष्यात ऐषारामी जीवनाकडे ओढा असतो. घरात टापटीप व्यवस्थितपणा याकडे लक्ष पुरवता.अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी उद्भवतात.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.

शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज छान बातमी मिळेल. मनोरंजनाचा आनंद घ्याल.विदेशी नात्यातून लाभ होईल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज बौद्धिक चातुर्याने लाभ मिळवाल. सौख्य लाभेल.नाट्य,गायन क्षेत्रात आवडीने भाग घ्याल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज सत्याच्या मार्गाने फायदा मिळेल. आरोग्य सांभाळा. खर्चिक दिवस.

कर्क:-मैत्रिणींनो आज ज्ञानलालसा वाढेल.धार्मिक कल राहील.।दानधर्म कराल.वाहन सौख्याचा दिवस.स्त्रियांच्या मार्फत लाभ घडेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज नवीन संधी चालून येतील.राजकिय क्षेत्रात यश मिळेल. धर्म कार्यासाठी वेळ द्याल.

कन्या:- मैत्रिणींनो आज तुमच्याबद्दल आदर वाटेल, मान मिळेल.विदेशात संपर्क होईल.उत्साहात रहाल.पतीची।साथ मिळेल.

तुळ:-मैत्रिणींनो आज कलाकारांना छान दिवस.कामात मानसन्मान ,यश मिळेल. तुमची लोकप्रियता वाढेल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज संमिश्र ग्रहमान आहे. सकाळ जरी संथ असली तरीकाही छान घटना घडतील. दुपारनंतर आनंदी रहाल.

धनु:-मैत्रिणींनो आज उत्साही वाटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.सहजीवनाचा आनंद घ्याल.

मकर:- मैत्रिणींनो आज मन समाधानी राहील. सौख्य लाभेल.भावंडाची साथ मिळेल.सर्व कामात यश मिळेल.सत्कार्य घडेल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज धार्मिक गोष्टींचा ओढा राहील.गरजू लोकांना मदत कराल. बुद्धीमत्ता वापरून यश मिळवाल.

मीन:- मैत्रिणींनो आज घरगुती कामात व्यस्त रहाल.काटेकोरपणे कामे करा.प्रवासाचे बेत आखले जाती

RELATED ARTICLES

Most Popular