लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 26/9/2025 सरकार मायबाप मराठवाड्यातील तथा महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व्यथा समजेल का ॽअसा प्रश्न पडला आहे. शक्ती पीठ महामार्ग 85 हजार कोटीचा महत्त्वाचा काॽ आज शेतकऱ्यावर असमानी संकट कोसळले आहे .शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे शेतकरी राजा महत्त्वाचा का ॽशक्तिपीठ महत्वाचा हा प्रश्न उद्भवतो. शक्तिपीठ महामार्ग होऊ द्या त्याबद्दल काही आमचं दुमत नाही. परंतु आज अशी वेळ आहे ते काम बाजूला सारून शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा हात देऊन त्यांचे उद्धवस्त झाले संसार पूर्वत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यास घरी बसवावे म्हणले खायला दाणा नाही .शेतात जावे म्हटले उभ्या शेतामध्ये एक पिकाचे धाट उभे नाही .अशी दैन्यवस्थ होऊन गेली आहे. आज तुम्हाला शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाचा वाढतो .शेतकरी परेशान आहे. याची कुठेतरी आपल्या मनात सद्भावना येऊ द्या.शेतकऱ्याना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे. व दिलेच पाहिजे .तर शेतकरी कुठेतरी थोडा तरी विसावेल .
सत्ता येईल सत्ता जाईल पण या शेतकऱ्यांचे हे अश्रू पुसण्याचे काम आपल्या माध्यमातून केले पाहिजे अन्यथा शेतकरी परेशान होऊन कोणाकडे दाद मागावी कोण त्यांचा पांडुरंग हेच कळायला मार्ग नाहीये.
