Homeईपेपरउदगीर जळकोट मतदार संघाच्या शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्या. माजी मंत्री तथा आमदार...

उदगीर जळकोट मतदार संघाच्या शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्या. माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 25/9/2025 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्ताची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर जळकोट येथील शेतकऱ्याची व्यथा मांडून लेखी निवेदन दिले. शेतीची नुकसन असेल. घरांची नुकसान असेल. बागेची नुकसान असेल. जनावरे असतील उदगीर जळकोट मतदार संघाच्या शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले पीक तरी शंभर टक्के गेले .काही ठिकाणच्या जमिनीची माती सुद्धा पाण्याने वाहून गेली. त्यामुळे उदगीर जळकोट मतदार संघाच्या शेतकऱ्याला विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी केली व लेखी निवेदन देऊन आपल्या अडचणी मांडल्या.

RELATED ARTICLES

Most Popular