लातूर प्रतिनिधी वार
मंगळवार, 26 मे 2026.
अधिक जेष्ठ शुक्ल एकादशी
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
आज वृद्धि तिथी आहे”
आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या
विष्टी करण शांती.
26 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध, शुक्र या ग्रहांचा संमिश्र प्रभाव असतो.
शनी ग्रहाबरोबरच चंद्र आणि शुक्र या ग्रहांचाही तुमच्यावर अंमल आहे. चंचलपणा ,अस्वस्थपणा तुमच्या बऱ्याच प्रमाणात आढळतो .नीटनेटकेपणा, सौंदर्यप्रसाधने, घराची सजावट इत्यादी गोष्टींची आवड असते. प्रवासाची आवड असून मित्र-मैत्रिणींचा सहवास विशेष प्रिय आहे .पैशाच्या बाबतीत नशीबवान असून सहजपणे पैसे मिळतात. आपल्या घराबद्दल परिवर प्रियजनाबद्दल ओढा असतो. मोठ्या व महत्त्वकांक्षी योजना पार पाडण्यात तुम्हाला आनंद वाटतो. तुमच्यात उत्स्फूर्तपणे उत्साह व जिवंतपणा असतो. तुमच्यावर शनिदेवांचा प्रभाव असल्याने तुमचा कल विरक्ती कडे किंवा मुक्ती कडे असतो. जीवनात बऱ्याच वेळेला अति कष्टाने यश साध्य होते. छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येतात. तुमच्यात अभ्यासाची खोली, शिस्त, गांभीर्य आणि कर्तव्याची जाणीव आहे. तुम्ही स्थिर वृत्तीचे आहात. कोणत्याही घटनेचा समतोल विचार करण्याची तुमची वृत्ती आहे. अनेकदा तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक धोरणीपणे निर्णय घेतात. तुम्ही कार्यमग्न असतात मात्र बुद्धिमत्ता वापरून कार्य करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल सहानुभूती वाटते. तुमचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आणि प्रसन्न आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही उत्तम पणे नियोजन करू शकतात. तुम्ही न्यायप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन उत्तम असते. कठीण काळाचे नियोजन कसे करावे हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असते.तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा आहे. तुमच्या समाज प्रक्रिया त्यामुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येतात। आयुष्यात प्रत्येक बाबतीत विलंब होतो त्यामुळे पैसे मिळवण्यातही अडचणी येतात. कष्टाच्या मानाने यश फार उशिरा मिळते.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रत्ने:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
शुभ रंग:- राखाडी.
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रिणींनो आज
कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. घरातील महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.
वृषभ
मैत्रिणींनो आज
प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. मुलांच्या प्रगतीची आनंदवार्ता मिळू शकते. नवीन खरेदीसाठी दिवस अनुकूल.
मिथुन
मैत्रिणींनो आज
घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून समाधानही मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या.
कर्क
मैत्रिणींनो आज
आज संवादकौशल्यामुळे कामे सहज होतील. मैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
सिंह
मैत्रिणींनो आज
आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस. दागिने, सौंदर्यविषयक वस्तूंवर खर्च होऊ शकतो. आत्मविश्वासामुळे इतरांवर प्रभाव पडेल.
कन्या
मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आकर्षण आणि ऊर्जा वाढेल. नवीन संधी मिळू शकतात.स्वतःच्या आनंदासाठी खर्च होईल. मनातील चिंता सोडून स्वतःवर विश्वास ठेवा.
तुळ
मैत्रिणींनो आज
भावनिक चढउतार जाणवू शकतात. जुन्या आठवणींमुळे मन थोडे अस्वस्थ राहील. ध्यान किंवा प्रार्थनेत मन शांतता मिळेल.
वृश्चिक
मैत्रिणींनो आज
मित्रपरिवारातून लाभ मिळेल. महिलांनी सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास नवीन ओळखी उपयोगी ठरतील. इच्छा पूर्ण होण्याचे संकेत.
धनु
मैत्रिणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. काम आणि घर यामध्ये समतोल राखणे आवश्यक.
मकर
मैत्रिणींनो आज
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. विद्यार्थिनींसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल.
कुंभ
मैत्रिणींनो आज
आरोग्य आणि खर्च याकडे लक्ष द्या. कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्या. संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होईल.
मीन
मैत्रिणींनो आज
नातेसंबंधात स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कला, संगीत किंवा सर्जनशील कामात आनंद मिळेल.
श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.