Homeईपेपरधर्मपाल धर्माचे पालन करणारा. धर्मपाल देवशेट्टे.

धर्मपाल धर्माचे पालन करणारा. धर्मपाल देवशेट्टे.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर. दिनांक 20/5/2026 जळकोट तालुक्यातील बेळसागांवी गावाचा सुपुत्र श्री धर्मपाल देवशेट्टे अण्णाराव सावकार चे सुपुत्र हे लहान पानांपासून वेगळ्या स्वभावाचे. प्रवाहाच्या विरोधात पोहणारा कार्यकर्ता म्हणजे धर्मपाल. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक असो की जळकोट बाजार समिती.नगर पंचायत असो. आपले वर्चस्व सिद्ध करून धनदांडगे असो सत्ताधारी असो सर्व सामान्य कार्यकर्ता सर्व सामान्य मतदार राजा यांच्या जिवावर आशीर्वादावर समोरील विरोधकास सळो की पळो करून सोडणारा कार्यकर्ता म्हणजे धर्मपाल देवशेट्टे.जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचा विश्वास म्हणजे धर्मपाल भाऊ. कालच्या सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणूक झाली त्या निवडणुकीत गाडी भरुन पैसा आला मात्र मतदार राज्या शांतपणे विचार करून भाऊला अपक्ष म्हणून निवडून देण्यासाठी आपले मत दिले. पण भाऊ ला बेईमान झाले नाही. कारण उदगीर जळकोट मतदार संघाची निवडणूक एकदाच पार पडली परंतु जळकोट मतदार संघातील सुजान जनता समोरील सर्व पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना ओळखून होती म्हणून धर्मपाल भाऊला अपक्ष म्हणून पसंत केले. ही जर जादू उदगीर जिल्हा परिषद मतदार संघात झाली असती तर बाबुराव आंबेगावे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हार मानवी लागली नसती. येणारी 2029 ची निवडणूक ही जर फेर बदल होऊन जर झाली तर जळकोट मतदार संघातील सर्वसामान्य जनता जसे जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान केले तसेच येणाऱ्या विधानसभेला सुद्धा मतदान करायला मागेपुढे पाहणार नाहीत अशी चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे. कालच्या एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा भाग असो अथवा जळकोट नगरपंचायत च्या विकासाचा प्रश्न असो. त्या विकासाच्या कामाची पुरेपूर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथाचे नाथ एकनाथ जी शिंदे यांच्याकडे सर्व जळकोट मतदार संघातील विकासाच्या कामाबद्दल माहिती देऊन आपल्याला डोंगरी भाग म्हणून जळकोट प्रसिद्ध आहे त्या जळकोट तालुक्यासाठी आपल्या मार्फत निधी देऊन सर्व कामे मार्गी लावी अशी निवेदन देऊन त्यांना विनंती केली. या सर्व धडपडीस व त्यांच्या कार्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. खरंच जर जळकोट तालुक्याचा

कायापालट करायचा असेल तर सर्व कार्यकर्त्यांनी याच्या मागे उभे राहिले पाहिजे. अशा ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीमध्ये उदगीर जळकोट मतदार संघामध्ये एकमेव कार्यकर्ता निर्भीडपणाने सत्ताधाऱ्याच्या विरोधात ठामपणे उभा राहून निवडून येऊन विकासाचे कामे करून आणतो एवढी हमी देणारा दुसरा कार्यकर्ता कोणीच नाही.

RELATED ARTICLES

Most Popular