लातूर प्रतिनिधी वार
रविवार, 17 मे 2026. अधिक जेष्ठ शुक्ल प्रतिपदा
मलमास आरंभ
गंगा दशहरा आरंभ
राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज करि दिन.
आज चन्द्र वृषभ राशीत आहे.
(अतिगंड योग, किस्तूंघन करण शांती)
17 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनि, बुध ,शुक्र तीन ग्रहांचा संमिश्र प्रभाव आहे. उत्कृष्ट संघटक व विचारी असतात .ध्येय व महत्वकांक्षा उच्च प्रतीच्या असतात, परंतु रूढी परंपरांचा तिरस्कार असतो. तुमचे विचार विधायक व क्रियाशील असतात .शांतता प्रिय असून लोक कल्याणाकरिता काम करतात. गुप्त विद्या, हिप्नॉटिझम अशा विषयांबद्दल आकर्षण असते. व्यक्तिमत्व प्रभावी असून तुम्ही धाडसी आणि स्वाभिमानी असतात .भावनांच्या बाबतीत थंड प्रकृती असते संशोधन याकडे ओढा असतो. नेतृत्व गाजवायची हौस असली तरी भावनाशीलता त्याच्यावर मात करते. जोरदार प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वतःच्या कल्पनेतून आणि विचारातूनच तुम्हाला यश मिळते.
तुमच्यावर शनिदेवांचा प्रभाव असल्याने तुमचा कल विरक्ती कडे किंवा मुक्ती कडे असतो. जीवनात बऱ्याच वेळेला अति कष्टाने यश साध्य होते. छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येतात. तुमच्यात अभ्यासाची खोली, शिस्त, गांभीर्य आणि कर्तव्याची जाणीव आहे. तुम्ही स्थिर वृत्तीचे आहात. कोणत्याही घटनेचा समतोल विचार करण्याची तुमची वृत्ती आहे. अनेकदा तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक धोरणीपणे निर्णय घेतात. तुम्ही कार्यमग्न असतात मात्र बुद्धिमत्ता वापरून कार्य करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल सहानुभूती वाटते. तुमचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आणि प्रसन्न आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही उत्तम पणे नियोजन करू शकतात. तुम्ही न्यायप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन उत्तम असते. कठीण काळाचे नियोजन कसे करावे हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असते.तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा आहे. तुमच्या समाज प्रक्रिया त्यामुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येतात। आयुष्यात प्रत्येक बाबतीत विलंब होतो त्यामुळे पैसे मिळवण्यातही अडचणी येतात. कष्टाच्या मानाने यश फार उशिरा मिळते.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रत्ने:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
शुभ रंग:- राखाडी.
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रिणींनो आज
आज आर्थिक नियोजन आणि घरगुती कामांमध्ये यश मिळेल. एखादी नवीन कल्पना फायदेशीर ठरू शकते. नातेसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा.
वृषभ
मैत्रिणींनो आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसेल. कामाच्या ठिकाणी कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.कामात अचानक बदल होऊ शकतो.
मिथुन
मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
बुधाच्या प्रभावामुळे मन सतत विचारात राहील. जुन्या आठवणी किंवा एखादी चिंता मनात येऊ शकते. ध्यान किंवा प्रार्थना मन शांत ठेवेल.
कर्क
मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.
सवंगडी, सहकारी किंवा समूहातून मदत मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
सिंह
मैत्रिणींनो आज
कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्यातून प्रगतीचे मार्गही खुलतील. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या
मैत्रिणींनो आज
आज प्रवास, शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. अध्यात्मिक विचार वाढतील. विद्यार्थिनींसाठी लाभदायक वेळ.
तुळ
मैत्रिणींनो आज
भावनिक निर्णय टाळा. आर्थिक व्यवहार जपून करा. गुप्त चिंता मनात ठेवू नका; जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा.
वृश्चिक
मैत्रिणींनो आज
वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. भागीदारीच्या कामात फायदा होईल.
धनु
मैत्रिणींनो आज
कामाचा ताण वाढू शकतो, पण नियोजन केल्यास सर्व व्यवस्थित पार पडेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी विश्रांतीसाठी वेळ द्यावा.
मकर
मैत्रिणींनो आज
सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
कुंभ
मैत्रिणींनो आज
घरातील वातावरणात बदल किंवा सजावटीचे विचार येतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. भावनिक स्थैर्य महत्त्वाचे ठरेल.
मीन
मैत्रिणींनो आज
संवाद आणि संपर्कातून लाभ मिळेल. छोटा प्रवास संभवतो. लेखन, शिक्षण किंवा मीडिया क्षेत्रातील महिलांना विशेष यश मिळू शकते. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.