Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी वार

शुक्रवार, 15 मे 2026. वैशाख कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी
शिवरात्री

राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12

आज क्षय तिथी आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी मेष आहे.
विष्टि/शकुनी करण शांती करून घेणे.

15 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहेत. मोठेपणा प्रतिष्ठा, सन्मान या गोष्टीला अधिक महत्त्व देतात .दुसऱ्याची परीक्षा झटपट करण्याचे ज्ञान तुमच्याकडे उपजतच असते. स्वतःचे गुण दाखवण्याची मात्र तुम्हाला संधी मिळावी लागते. बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती उत्तम असते. दुसऱ्याला न दुखवता सहकार्य करण्याकडे कल असतो. घर ,संसार, मित्र यांच्या बद्दल आपुलकीचे नाती जोडले जातात आणि त्यात तुम्ही खूप गुरफटता. चाणाक्ष असून निरीक्षण चांगले असते. तुम्ही जन्मताच कलासक्त आणि स्वतः एक कलाकार आहेत तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि व्यापारी साठी आवश्यक तो धूर्तपणा तुमच्या मध्ये आहे तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे आणि तुम्ही लोक प्रिय आहात तुमच्या बोलण्यामध्ये मोहक पण आहे आणि तुमचा मित्रमंडळींचा सर्कल मोठा असतात तुमच्या रूढी आणि परंपरा संबंधीत कल्पना इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असल्या तरी तुम्हाला त्या आवडतात आणि इतरांना त्या समजून घेणे जरा कठीण झाले तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतात तुमच्या उद्दिष्टापासून वेळ बाजूला होत नाही तुम्ही बोलण्यात हुशार आहात तुम्हाला कीर्ती आणि मानसन्मान मिळतो वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये समारंभांमध्ये सामाजिक कार्यात भाग घेणे तुम्हाला आवडतं तुम्ही इतरांना आनंदाने मदत करतात धार्मिक आणि तत्वज्ञान विषयाची तुम्हाला आवड असते तुमचे आयुष्य कमी कष्टाचे जाते तुम्ही उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य दागिने वाहने कपडे वापरतात प्रेमाच्या बाबतीत तुम्ही संशयी असता. आरोग्याने सुदृढ असतात. विचाराने मनमोकळ्या असतात रुढीबद्ध आयुष्य आवडत नाही तरी स्वभाव नम्र असतो. पतिला योग्य ती साथ तुम्ही देता. घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी रमता. निष्ठावान जबाबदार प्रेमळ आई व पत्नी म्हणून तुम्हाला मान्यता मिळते.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- निळा.

शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

मेष

मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.
आज आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळेल. घरातील एखादा जुना प्रश्न सोडवण्याची संधी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. अनावश्यक चिंता टाळा. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. अध्यात्म किंवा ध्यानातून मानसिक शांतता मिळेल.

मिथुन

मैत्रिणींनो आज लाभात चन्द्र आहे.
मैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. सोशल मीडियावरून आनंददायी बातमी मिळू शकते.

कर्क

मैत्रिणींनो आज दशमात चंद्र आहे.
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. घर आणि काम यामध्ये समतोल राखावा लागेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह

मैत्रिणींनो आज भाग्यात चन्द्र आहे.
भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग येऊ शकतात. विद्यार्थिनींसाठी दिवस प्रेरणादायी राहील. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभाग होईल.

कन्या

मैत्रिणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.मन अस्वस्थ राहील.
भावनिक निर्णय घेणे टाळा. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा. जोडीदाराशी संवाद शांतपणे ठेवा. अचानक खर्च वाढू शकतो.

तुळ

मैत्रिणींनो आज सप्तमात चन्द्र आहे.
नातेसंबंधांमध्ये स्पष्टता येईल. विवाह किंवा प्रेमसंबंधांमध्ये महत्त्वाची चर्चा होऊ शकते. भागीदारीच्या कामात यश मिळेल.

वृश्चिक

मैत्रिणींनो आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
कामाचा ताण वाढू शकतो पण मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. महिलांनी आज विश्रांतीलाही वेळ द्यावा.

धनु

मैत्रिणींनो आज पंचम स्थानी चन्द्र आहे.
प्रेमात यश. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

मकर

मैत्रिणींनो आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्ता किंवा घरासंबंधी विचार पुढे जाऊ शकतात. मनातील जुने दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

मैत्रिणींनो आज तृतीया त चन्द्र आहे.
संवाद कौशल्यामुळे कामे पूर्ण होतील. भावंडांकडून मदत मिळेल. छोटा प्रवास लाभदायक ठरेल. नवीन ओळखी वाढतील.

मीन

मैत्रिणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत चांगले संकेत आहेत. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. महिलांना स्वतःसाठी वेळ मिळेल.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular