लातूर प्रतिनिधी 13/5/2026 राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात अधिक जोमाने काम करत आहे. शिवसेनेच्या या कामाने अधिक प्रभावित होऊन राज्यातील विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे. याच पार्श्वभुमीवर आज कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), उबाठा पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी कल्याण परिसरातील विभाग अध्यक्ष गणेश मुंढे, निकिता मुंढे, ऊबाठा शाखाध्यक्ष किरण जाधव, मनोज पावशे, सोनिया म्हात्रे, हेमंत जाधव, पुष्पा पानिकर,चंद्रकांत मोटे, जावेद शेख, ज्योती माळी, वैभव कुलकर्णी, भूषण अहिरे, सुनीता गव्हाणे,अलका देवरे, चारुलता विश्वकर्मा, सुषमा साळवी, सुनीता सानप, अबू खान, अरीफ खान, राजेंद्र आडागळे, सूरज घाडगे, सतीश आढागळे, रोहित लोंढे, दीपक घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य सिंधी सेलच्या जया साधवानी आणि कामगार नेते राजेंद्र अढांगळे यांच्या पुढाकाराने नशा मुक्ती अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवसेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक रमाकांत मढवी, अब्दुल भाई शेख, निलेश पाटील, निखिल चौधरी, अर्जुन धाबी यांच्यासह इतर स्थानिक नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.