लातूर प्रतिनिधी वार
मंगळवार, 12 मे 2026. वैशाख कृष्ण दशमी
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
“आज वैधरुती वर्ज दिवस आहे” घबाड दुपारी 2:53 पर्यंत.
आज जन्मलेल्या बाळाची कुंभ रास/संध्याकाळी 7:25 नंतर मीन रास असून विष्टी करण ,वैध्रृती योग शांती करणे.
12 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा सुखासीन जीवनाकडे ओढा आहे. इतरांचे बारीक-बारीक दोष तुम्ही सहजपणे काढू शकता. अधिकार, प्रतिष्ठा तुम्हाला आपोआप मिळते. तुम्ही दुसऱ्याच्या साठी स्वार्थ त्याग करता पण त्यांच्या कारस्थानाला बळी पडतात. तुमच्या फाजील महत्त्वकांक्षा असते. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही .तुम्ही शब्दात व कृती ठाम असतात. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असतो .विवाह नंतर भाग्योदय होतो. वयाच्या 39 नंतर स्थिरता मिळते. महत्त्वकांक्षी असून मानसन्मान व प्रतिष्ठा या गोष्टीचे जपणूक करता .स्वतःच्या ज्ञानाविषयी आत्मविश्वास असतो .धर्माबद्दल ओढ असते परंतु त्याकडे डोळसपणे पाहता. दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट घेता. अडचणीत आलेल्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतात .तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात दिमाख असून टापटीप ,व्यवस्थितपणा काटेकोरपणा आहे. तुमच्यातील कौशल्य बुद्धीत आणि कृतीत पण असते .तुम्हाला खेळण्याची हौस असते .हातातील कार्यास कसे मिळवावे हे तुम्ही याचे नियोजन तुम्ही करता .गूढविद्येची आवड असते .तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो. उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यावर योग्य तो मार्ग शोधून काढतात. स्वतःच्या चाणाक्ष ,धूर्त स्वभावामुळे नोकरी उद्योग व्यवस्थित सांभाळता .स्वतःच्या कष्टाचा मोबदला चांगल्या रीतीने मिळवता. खर्चिक असून प्रिय व्यक्तीसाठी भरमसाठ खर्च करता .पैशामुळे जेवढे सुखे उपभोक्ता येतील त्या सर्वांचा आनंद लुटता .जीवन आरामदायी जाईल याकडे लक्ष असते. तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात .तुम्हाला घराबद्दल आपले पण आहे पण ओढा नाही .तुमची इच्छा शक्ती तीव्र अजून बुद्धी ,तल्लख असते. स्वभाव हरहुन्नरी आहे .लहरी असून कृतीने हळवे असता.आपल्या पतीला योग्य ती साथ देण्यात तुम्हाला अभिमान वाटतो .प्रेमळ व निष्ठावान असून चांगली सह धर्मचारणी म्हणून लौकिक मिळवता..
शुभ दिवस -मंगळवार, गुरुवार ,शुक्रवार
शुभ रंग :-पिवळा ,जांभळा हिरवा.
शुभरत्ने :-पुष्कराज ,लसण्या.
आजचे राशिभविष्य
१२ मे २०२६ – महिलांसाठी राशिभविष्य
आज चंद्र सकाळपासून कुंभ राशीत राहून संध्याकाळी 7:25 नंतर मीन राशीत प्रवेश करतो. रवी–चंद्र लाभ योग आणि चंद्र–बुध लाभ योगामुळे संवाद, सामाजिक संपर्क आणि सकारात्मक विचार यांचा प्रभाव वाढेल. चंद्र–गुरू त्रिकोण योग भाग्य आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे, तर चंद्र–शुक्र केंद्र योग नातेसंबंधात सौम्यता आणि आनंद निर्माण करेल. आजचा दिवस संबंध, प्रगती आणि भावनिक संतुलनासाठी शुभ आहे.
♈ मेष
मैत्रिणींनो आज सामूहिक कामात,तसेच सोशल मीडिया मार्फत लाभ घडेल.
ओळखींतून फायदा मिळेल. संध्याकाळनंतर मन थोडे भावुक होऊ शकते.प्रेमसंबंधात यश.
♉ वृषभ
मैत्रिणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. पतीचे सहकार्य लाभेल. कामातील कल्पकता आणि आत्मविश्वासामुळे यश मिळेल.
♊ मिथुन
मैत्रिणींनो आज
प्रवास, शिक्षण किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिवस अनुकूल आहे. संवादातून चांगल्या संधी मिळू शकतात.
♋ कर्क
मैत्रिणींनो आज
आर्थिक विषयांमध्ये सुधारणा दिसेल. गुंतवणूक किंवा बचतीबाबत योग्य निर्णय घेऊ शकाल. अंतर्मनाचा कौल लाभदायक ठरेल.
♌ सिंह
मैत्रिणींनो आज
नातेसंबंधात आनंद आणि जवळीक वाढेल.भेटीगाठी होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. भागीदारीत लाभ होऊ शकतो.पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.
♍ कन्या
मैत्रिणींनो आज
कामात गती आणि शिस्त राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.छोटे आर्थिक लाभ घडतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.खाण्याची पथ्ये पाळा.
♎ तुला
मैत्रिणींनो आज
आजचा दिवस प्रेम, सर्जनशीलता आणि आनंदासाठी उत्तम आहे. विद्यार्थिनींसाठी अभ्यासात सकारात्मक प्रगती दिसेल.
♏ वृश्चिक
मैत्रिणींनो आज
घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील एखादी शुभ बातमी मन प्रसन्न करेल.घरातील इंटेरिअर वर खर्च कराल.
♐ धनु
मैत्रिणींनो आज
बोलण्यातून लाभ मिळेल. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.
♑ मकर
मैत्रिणींनो आज
आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.छोटे प्रवास होतील.
♒ कुंभ
मैत्रिणींनो आज उत्तम दिवस.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहील. व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसेल. संध्याकाळनंतर संवादातून लाभ होईल.सौख्य लाभेल.सुरूची भोजनाचा आस्वाद घ्याल.
♓ मीन
मैत्रिणींनो आज
संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत आल्यामुळे मन अधिक शांत आणि भावुक होईल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढू शकते
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.