लातूर प्रतिनिधी वार
गुरूवार, 16 एप्रिल 2026. चैत्र कृष्ण चतुर्दशी
राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3
आज चतुर्दशी वर्ज दिवस .
आज जन्मलेल्या बाळाची रास मीन असून शकुनी करण, विष्टि करण शांती करून घेणे.
16 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर नेपच्यून आणि मंगळ या ग्रहाचा अंमल आहे.
तुम्ही मनाने उदार स्वभावाने विनोदी आहात. भावनाप्रधान आणि हळवे असतात .फार कष्टाची कामे तुम्हाला झेपत नाही .तुम्ही लवकर अस्वस्थ होतात व शांतही लवकर होतात .तब्येतीची तक्रारी सतत चालू राहतात .चांगली ,यशस्वी मुले होण्यात तुम्ही नशीबवान असता.वैवाहिक जीवनात काहीतरी न्यूनता जाणवत असते .मनात सतत काहीतरी विचार चालू असतो त्यामुळे रागीटपणा वाढतो .इतरांची ढवळाढवळ कामात तुम्हाला सहन होत नाही .स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव दाखवत नाही. एकीकडे तुम्हाला राहू शकत आवडतात तर गंभीर विषयातही तुम्ही रमता .स्मरणशक्ती दांडगी असते. ठराविक चाकोरीत जाणे तुम्हाला आवडत नाही. उच्च कोटीचा अहंकार असतो. पक्षाप्रमाणे स्वैर विचाराची आवड असते .तुमची वागणूक गुढ असते .पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिच्याशी तोंड देण्याची तुमची ताकद असते .मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे प्रतिकार धाडस ,तडफ, तत्परता हे गुण तुमचे आहेत.बोलण्यात नाजूकपणा किंवा युक्तिवाद कमीच असतो. तुमचे व्यक्तिमत्व स्वतंत्र असते .तुम्हाला दूरच्या प्रदेशाची आवड असून काही ना काही निमित्ताने परदेशाशी संबंध येतो. पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींचेच निवड करता. भावनाप्रधान असूनही भावना लपवण्याकडे कल असतो. सर्वसाधारण विचारसरणीच्या लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही .मित्र-मैत्रिणींबद्दल आदर असून वेळाप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तयार असतात. दुसऱ्यावर दया करण्यात आनंद मिळतो. तुमच्या स्वभाव मात्र तापट आहे .कोणी सल्ला विचारल्यास तुम्ही अधिकार पणाने व खंबीरपणे देतात .स्वतःची खात्री झाल्यावर झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही .महत्त्वाकांक्षा उत्साह व चिकाटी चांगली असते. मनमोकळ्या स्वभावाचे असतात. रूढी परंपरा कंटाळवाण्या वाटल्यास तुमच्याकडे बंड करण्याची प्रवृत्ती असते. तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. आयुष्यात वारंवार बदल होत असल्यामुळे बचत करणे कठीण जाते .इतके असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात. श्रीमंतपणाचा डौल दाखवणे इतके पैसे तुम्हाला नक्कीच मिळतात. उधळ्या स्वभाव असून घरात सर्व सुख सोयी करता. अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडता. मित्र-मैत्रिणींना जेवणास बोलवणे ,मेजवानी देणे, आलेल्यांचे आदरा तिथ्य करणे मनापासून आवडते .स्वभाव हरहुन्नरी असून नीटनेटकेपणा ,चांगल्या कपड्यांचे शौकीन असता. घरातील सजावटीकडे लक्ष पुरवता.तुम्हाला घराबद्दल आपलेपणा आहे परंतु ओढा नाही .तुमच्या नवऱ्याने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे ही अपेक्षा करता.
शुभ दिवस- रविवार ,सोमवार बुधवार, गुरुवार
शुभ रंग :–पांढरा ,हिरवा पिवळा
शुभ रत्ने:- पुष्कराज , मोती पाचू
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली तपासून पहावी)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाचा ताण जाणवेल, पण वरिष्ठांची मदत मिळेल. मनात असलेली चिंता कोणाशी तरी बोलून कमी करा.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आज तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. मित्र-मैत्रिणी किंवा भावंडांकडून मदत मिळेल. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार करू शकता.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च वाढू शकतो, पण गुरुच्या प्रभावामुळे पैशाची अडचण फार जाणवणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या भाग्यस्थानी असल्यामुळे आज आत्मविश्वास वाढेल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. नातेसंबंधात स्थैर्य येईल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवेल, पण दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
मित्र आणि समाजातून फायदा होईल. एखाद्या स्त्रीकडून किंवा मैत्रिणीकडून चांगला सल्ला मिळेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
♎ तुला
मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. मात्र कामात जास्त जबाबदारी येईल, त्यामुळे वेळेचे नियोजन करा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
भाग्य तुमच्या बाजूने आहे. प्रवास, शिक्षण किंवा धार्मिक कामातून आनंद मिळेल. गुरुच्या प्रभावामुळे मनात सकारात्मकता राहील.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
आज आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. गुंतवणूक किंवा कर्जासंबंधी गोष्टीत घाई करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
वैवाहिक आणि प्रेमसंबंधात गंभीर चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत संयमाने वागल्यास नातं अधिक मजबूत होईल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
सामाजिक आणि नाविन्यपूर्ण विचार. मित्र-मैत्रिणींसोबत आनंद, अप्रत्याशित संधी. करिअरमध्ये नवीन कल्पना कामी येतील. आर्थिक मध्यम. आरोग्य: रक्ताभिसरण आणि शांती.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे भावना तीव्र होतील. तुमचा प्रभाव आणि आकर्षण वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या येतील, पण त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल.
✨ आजचा उपाय:
शनी आणि गुरुची कृपा मिळवण्यासाठी पिवळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. “ॐ गुरवे नमः” आणि “ॐ शं शनैश्चराय नमः” जप केल्याने मन स्थिर राहील.
श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.