Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.वार

मंगळवार, 7 एप्रिल 2026. चैत्र कृष्ण पंचमी

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30

आज जेष्ठा वर्ज्य दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक असून व्यतिपात योग शांती करून घेणे.

7 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर नेपच्यून आणि मंगळ या ग्रहाचा अंमल आहे. ठराविक चाकोरीत जाणे तुम्हाला आवडत नाही. उच्च कोटीचा अहंकार असतो. पक्षाप्रमाणे स्वैर विचाराची आवड असते .तुमची वागणूक गुढ असते .पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिच्याशी तोंड देण्याची तुमची ताकद असते .मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे प्रतिकार धाडस ,तडफ, तत्परता हे गुण तुमचे आहेत.बोलण्यात नाजूकपणा किंवा युक्तिवाद कमीच असतो. तुमचे व्यक्तिमत्व स्वतंत्र असते .तुम्हाला दूरच्या प्रदेशाची आवड असून काही ना काही निमित्ताने परदेशाशी संबंध येतो. पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींचेच निवड करता. भावनाप्रधान असूनही भावना लपवण्याकडे कल असतो. सर्वसाधारण विचारसरणीच्या लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही .मित्र-मैत्रिणींबद्दल आदर असून वेळाप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तयार असतात. दुसऱ्यावर दया करण्यात आनंद मिळतो. तुमच्या स्वभाव मात्र तापट आहे .कोणी सल्ला विचारल्यास तुम्ही अधिकार पणाने व खंबीरपणे देतात .स्वतःची खात्री झाल्यावर झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही .महत्त्वाकांक्षा उत्साह व चिकाटी चांगली असते. मनमोकळ्या स्वभावाचे असतात. रूढी परंपरा कंटाळवाण्या वाटल्यास तुमच्याकडे बंड करण्याची प्रवृत्ती असते. तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. आयुष्यात वारंवार बदल होत असल्यामुळे बचत करणे कठीण जाते .इतके असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात. श्रीमंतपणाचा डौल दाखवणे इतके पैसे तुम्हाला नक्कीच मिळतात. उधळ्या स्वभाव असून घरात सर्व सुख सोयी करता. अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडता. मित्र-मैत्रिणींना जेवणास बोलवणे ,मेजवानी देणे, आलेल्यांचे आदरा तिथ्य करणे मनापासून आवडते .स्वभाव हरहुन्नरी असून नीटनेटकेपणा ,चांगल्या कपड्यांचे शौकीन असता. घरातील सजावटीकडे लक्ष पुरवता.तुम्हाला घराबद्दल आपलेपणा आहे परंतु ओढा नाही .तुमच्या नवऱ्याने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे ही अपेक्षा करता.
शुभ दिवस- रविवार ,सोमवार बुधवार, गुरुवार
शुभ रंग :–पांढरा ,हिरवा पिवळा
शुभ रत्ने:- पुष्कराज , मोती पाचू
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली तपासून पहावी)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
नात्यांमध्ये प्रामाणिक संवाद ठेवा. आर्थिक बाबतीत अचानक लाभ होण्याची शक्यता. स्वतःवर विश्वास ठेवा.कागदपत्रे नीट तपासून घ्या.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, पण संवादाने सर्व ठीक होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. संयम ठेवा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
आज कामाचा ताण जाणवेल, पण बुधाच्या प्रभावामुळे योग्य निर्णय घेऊ शकाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
आजचा दिवस आनंददायी. प्रेमात यश. सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
घरगुती वातावरणात थोडा तणाव संभवतो. शांतपणे परिस्थिती हाताळा. आईशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील.वाहन दुरुस्ती संभवते.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
संवाद कौशल्यामुळे तुम्ही लोकांना प्रभावित कराल. लहान प्रवास संभवतो. भावंडांसोबत संबंध सुधारतील.सोशल मीडिया मधून लाभ होईल.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत चांगला दिवस. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्व खुलून दिसेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ.मोजके बोला.प्रवासात काळजी घ्या.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. ध्यान-प्रार्थनेत मन लावा. गुप्त शत्रूं पासून सावध राहा.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
मित्रांकडून मदत मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. सामाजिक वर्तुळ वाढेल.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची संधी. वरिष्ठांकडून कौतुक होईल. जबाबदाऱ्या वाढतील पण यशही मिळेल.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
नशिबाची साथ मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. दूरचा प्रवास संभवत. निलेश अंबादास देशमुख बैगलोर.
मोबाईल 9561796324.
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular