Homeईपेपरसुविचार

सुविचार

ललातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 30/3/2026गृहीत इव केशेषु

“अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत् । गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ।।”

शहाण्या माणसाने ज्ञान आणि धन यांची प्राप्ती अशी करावी जणू तो कधीही म्हातारा होणार नाही किंवा मरणार नाही. पण धर्माचे आचरण असे करावे जणू मृत्यूने त्याचे केस धरून त्याला ओढले आहे (म्हणजेच मृत्यू कधीही येऊ शकतो). हा श्लोक विद्या, संपत्ती आणि धर्माच्या संतुलित जाणीवेचे महत्त्व सांगतो. ज्ञान आणि संपत्ती मिळवताना दीर्घायुष्याचा विचार करावा, परंतु धर्माचे आचरण करण्यास विलंब करू नये, कारण मृत्यू कधीही येऊ शकतो. याचा अर्थ असा की संसारातील ध्येयांसाठी प्रयत्न करावेत, पण धर्म आणि सद्गुणांची कधीही उपेक्षा करू नये. अंबादास वसंतराव देशमुख.🙏

RELATED ARTICLES

Most Popular