ललातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 27/3/2026गुणाः सर्वत्र पूज्यन्ते
“गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् । केतकीगन्धमाघ्रातुं स्वयं गच्छन्ति षट्पदाः ।।”
गुणी लोक जरी दूर राहत असले, तरी त्यांचे गुण सर्वत्र पूजनीय ठरतात. जसे भ्रमर स्वतःच केतकीच्या फुलाचा सुवास घेण्यासाठी त्याच्या दिशेने जातात. या श्लोकात गुणांची सार्वत्रिक मान्यता आणि त्यांची स्वतःच ओळख निर्माण करण्याची ताकद याबद्दल सांगितले आहे. जसे केतकीच्या फुलाचा गंध घेतल्याशिवाय भ्रमर राहू शकत नाहीत, तसेच गुणी व्यक्ती कोणत्याही ठिकाणी असली तरी तिच्या गुणवत्तेमुळे लोक तिचा सन्मान करतात. गुणधर्म हे अशी संपत्ती आहे जी कोठेही असली तरीही ओळखली जाते आणि आपसूकच लोकांना आकर्षित करते.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏