लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर महिलांसाठी ज्योतिष:-
लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
सोमवार, 23 मार्च 2026. चैत्र शुक्ल पंचमी
श्री पंचमी
हयव्रत
राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9
आज कृतिका वर्ज्य दिवस. आज जन्मलेल्या बाळाची रास वृषभ.(विष्कभं योग)
23 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही महत्त्वकांक्षी असून सर्व विषयाची माहिती असावी असे तुम्हाला वाटते .कायद्याचे पालन करायला आवडते. शांतता प्रिय असता परंतु बहुता भोगवादी मित्रपरिवार असतो .तुम्हाला व्यावहारिक वाद्यात्मिक दोन्ही गोष्टीची जोड मिळते .संगीत वाङ्मय प्रवासाची आवड असते. पाण्याजवळ तुमचा भाग्योदय होतो .तुम्हाला वरिष्ठांकडून मदत संरक्षण मिळते. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. विरुद्ध लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असता .तुमच्याजवळ चांगली शब्द संपत्ती असल्यामुळे बोलण्यात लिखाणात, भाषण देण्यात तुम्हाला यश मिळते. सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात.
तुमच्या धूर्तपणा झटपट व व्यापारी वृत्ती आहे. आपल्या आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात उत्तम उपयोग करता. स्वतःचे विचार दुसऱ्याला सांगण्याची हौस असते. तुमचे ध्येय कार्य आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न सतत करीत असता. तुम्हाला खेळण्याची व प्रवासाची आवड आहे .तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा आवडत नाही .तुम्हाला समाजात मिसळणे निरनिराळ्या समारंभात भाग घेणे आवडते. कोणत्याही अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे याचा मार्गदर्शन आपोआप मिळते. सहकारी वृत्ती असून दुसऱ्याला मदत करायला आवडते धर्म व तत्वज्ञान गोष्टीच्या आवड असते. हातातील कामात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता .तुमच्या महत्त्वकांक्षा हा आर्थिक आणि वैचारिक स्वरूपाचे असतात भविष्यात चढ-उत्तर अपेक्षित असतात. पैशाच्या बाबतीत निष्कळजी असल्यामुळे काहीच पैशाची साठवण कमीच असते. चाणाक्ष दृष्टिकोनामुळे यश मिळते, कष्टाची चीज होते. पतीला योग्य ती साथ तुम्ही देता ,त्याच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करतात. आरामशीर आयुष्याची आवड असून बराच वेळ आपल्या रिकामपणात घालवता. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमता .घरात टापटीप , व्यवस्थित पणा ठेवता पण ही कामे दुसऱ्यांकडून घेण्यात तुम्ही हुशार असता.
शुभ दिवस:- बुधवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रंग – पांढरा, पिवळा ,हिरवा
शुभ रत्ने:-हिरा, पाचू किंवा नीलम
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रीणींनो आज
आज तुम्ही घर आणि काम दोन्ही सांभाळण्यात यशस्वी ठराल. आर्थिक बाबतीत थोडी सुधारणा होईल. मात्र भावनिक निर्णय घेताना सावध रहा. जोडीदारासोबत गैरसमज टाळा.
वृषभ
मैत्रीणींनो आज
आज तुमचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. महिलांना नवीन संधी मिळू शकतात. स्वतःसाठी वेळ काढा.अचानक धनलाभ होऊ शकतो.
मिथुन
मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
मनात चिंता आणि अस्वस्थता जाणवू शकते. जास्त विचार टाळा. गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका. ध्यान आणि प्रार्थना उपयुक्त ठरेल.
कर्क
मैत्रीणींनो आजलाभस्थानी चन्द्र आहे.
मैत्रिणींचा सहवास आणि सामाजिक जीवन आनंददायी राहील. एखादी इच्छा पूर्ण होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत.
सिंह
मैत्रीणींनो आज
करिअर करणाऱ्या महिलांसाठी उत्तम दिवस. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. घर आणि काम यामध्ये संतुलन साधावे लागेल.
कन्या
मैत्रीणींनो आज
भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
तुळ
मैत्रीणींनो आज
आज थोडी मानसिक अस्थिरता जाणवू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा.
वृश्चिक
मैत्रीणींनो आज
वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. जोडीदारासोबत संवाद वाढेल. भागीदारीत काम करणाऱ्या महिलांना लाभ होईल.
धनु
मैत्रीणींनो आज
कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही ते व्यवस्थित हाताळाल. आरोग्याची काळजी घ्या. स्वतःवर जास्त ताण घेऊ नका.
मकर
मैत्रीणींनो आज
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. सर्जनशील काम करणाऱ्या महिलांना यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
कुंभ
मैत्रीणींनो आज
घरगुती वातावरण सुखद राहील. घरात काही बदल किंवा सजावट करण्याची इच्छा होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मीन
मैत्रीणींनो आज
संवाद कौशल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. छोट्या प्रवासाचे योग आहे .श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर मो 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.