लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
रविवार, 22 मार्च 2026. चैत्र शुक्ल चतुर्थी, विनायकी चतुर्थी
राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज वैधरुती वर्ज दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची राशी मेष, विष्टि करण वैधरुती योग शांती करणे.
22 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी उंच असून डोळे आकर्षक असतात.स्वभाव अस्थिर असून अनपेक्षितपणे वागता.विरुद्धलिंगी व्यक्ती कडून लाभ होतो.आयुष्यात मोठ्या व जबाबदारी ची कामे यशस्वी रीतीने पार पाडता. कौटुंबिक जीवन सुखाचे असते.मैत्र परिवार मोठा असून ही अलिप्त वृत्ती असते.दिमाख व वागण्यात रूबाब असतो.आयुष्यात 40 ते 60 ही महत्वाची वर्षे असतात.
तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चढउतार होतात. तुमच्या आयुष्यात चळवळी होतात. आणि गतिमान असते. आयुष्यामध्ये उत्साहवर्धक आणि चांगले अनुभव येतात. तुम्ही झटपट विचार करतात आणि त्वरित निर्णय घेतात. तुमच्या बुद्धीचा आणि कृतीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होतो. तुम्ही रूढी आणि बंधने यांना फारसे महत्त्व देत नाहीत. व्यक्तिमत्व आकर्षक असते. खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. इतरांवर तुम्ही तुमचे विचार लादत असतात. सतत विरोध करण्याच्या किंवा वाद घालण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला गुप्त शत्रू निर्माण होतात. तुमच्याबद्दल गैरसमज पसरतात. आत्मविश्वास चांगला असतो. तुम्ही स्वतःचे विचार आणि कल्पना ठामपणे मांडू शकतात. बऱ्याच वेळेला तुम्ही हातचे राखून ठेवणे पसंत करतात. इतरांना मनमोकळेपणे काही सांगत नाहीत. काही वेळा तुम्ही चाकोरी बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. सामाजिक जीवनात तुम्ही कार्यरत असतात. जीवनात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटतंय. तुमचा मैत्र परिवार देखील कायम बदलत असतो. झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटते. तुम्हाला घरातील लोकांपासून आणि नातेवाईकांपासून त्रास होतो.वंशपरंपरेने पैसा मिळण्याचे योग असतात.श्रीमंती चा दौल दिसतो.वयाच्या 40 नंतर आर्थिक स्थैर्य लाभते. तुम्ही तल्लख व आकर्षक आहात .तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व्यवस्थित सुंदर कपड्यांचे शौकीन असतात. तुमच्या स्वभाव हरहुन्नरी असतो. बऱ्याच वेळा स्वतःच्या वरचढपणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा चमत्कारी स्वभावमुळे सबंध दिवस खराब जातो .तुम्हाला घराबद्दल आपलेपण आहे पण ओढ नसते. बऱ्याच वेळा अस्वस्थ असतात अशा वेळेस एक किंवा दोन भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यात राहते फायदेशीर असते .तुम्ही तापट असून काही वेळा कठोरपणा दिसून येतो. घरातील सर्व लोकांनी तुमच्या तालावर नाचावे अशी तुमची वागणूक असते. मृदूपणाचा अभाव असतो.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.
शुभ रंग – निळा, राखाडी, पांढरा, लाल.
शुभ रत्ने:-हिरा, पोवळे ,मोती
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
चंद्र तुमच्या राशीत – आज तुमचा दिवस आहे,तुमचं वर्चस्व राहील.
उत्साह वाढेल. पण पटकन राग येईल.
कामात पुढाकार घ्याल
उतावळेपणा टाळा.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
मन थोडं अस्थिर. आतून गोंधळ, बाहेर शांतता.नात्यात गैरसमज होऊ शकतो
जास्त विचार करू नका,अचानक चिडचिड होऊ शकते.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभदायक.
नवीन कल्पना सुचतील.
सकारात्मक लोकांमध्ये रहा.रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
काम आणि घर दोन्ही सांभाळताना ताण येईल.योग्य निर्णय घ्या.
चिडचिड होईल.
स्वतःवर जास्त ओझं टाकू नका
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आत्मविश्वास वाढेल.
मीपणा सोडा.भाग्याची साथ मिळेल.तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबींमध्ये सावध रहा.कागदपत्रे नीट तपासून घ्या.कामात अचानक बदल घडू शकतो.
मनात विनाकारण चिंता वाटेल.
हट्ट सोडा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधात समतोल राखणं गरजेचं.
स्पष्ट पण सौम्य पणे बोलणे ठेवा.समजूतदार भूमिका ठेवा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
कामात गती येईल.समस्येवर तोडगा मिळेल.
रागावर नियंत्रण ठेवा.पतीशी मतभेद होऊ शकतात.
♐ धनू
मैत्रीणींनो आज
उत्साह, प्रवास घडेल, नवीन संधी येतील. कल्पना आणि वास्तव यातला फरक ओळखून कामे करा.नात्यात गोडवा राहील.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील.घरगूती कामात व्यस्त रहाल.चिडचिड वाढेल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज मनातले कृतीत उतरवाल. धडाडीने कामे होतील.गोड बोलून
संवादातून काम साध्य होईल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज पैशाची चिंता वाटेल.घरात तुमची भुमिका महत्वाची ठरेल.स्वतःच्या महत्व वाढण्याकडे लक्ष द्या
श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.मोबाइल 9561796324.
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.