Homeईपेपरभ्रष्ट+आचार=भ्रष्टाचार.

भ्रष्ट+आचार=भ्रष्टाचार.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 15/3/2026 वार रविवार.

भ्रस्ट+ आचार= भ्रस्टाचार. भ्रस्ट आचरण म्हणजे भ्रस्टाचार. अनैतिक वर्तन म्हणजे भ्रस्टाचार. अनैतिक वर्तन म्हणजे चोरी करणे, नशाबाजी करणे, जुवा खेळणे, व्याभिचार करणे, बलात्कार करणे, अमिश दाखविणे, खोटे बोलणे, लालचीपणा, आधाशिपण, हाव हाव करणे, लोभीपण, हावरेपण, दुष्ठ निती, बुरीनजर, काळा बाजार करणे, साठेबाजी करणे, दामदुप्पट भावाने विक्री करणे, अधिकाकाधिक नफा कामाविणे, फसवणूक करणे, धोका देणे, इतरांच्या संपतीवर डोळा ठेवणे, दुर्बल कुटुंबावर व्यक्तीवर दादागिरी करून त्याची प्रॉपर्टी बळकवणे, साध्या भोळ्यास फसविणे, गोडगोड बोलून काटा काढणे, योजना किंवा कल्याणकारी कामात, सार्वजनिक कामात भ्रस्टाचार चोरी करणे, उदा. आमदार खासदार फंडातील पैसे खाणे, धोडक्यात आपल्या खाजगी जीवनात, सार्वजनिक जीवनात, धार्मिक जीवनात दुराचार, अन्याय, अत्याचार, दादागिरी, हिंसा, चोरी, मारामारी करणे. अवैध मार्गाने श्रीमंत होणे, खोटा प्रचार करून प्रसिद्धी मिळवणे म्हणजेच भ्रस्टाचारी जीवन जगणे होय. आपल्या वर्तनाने एखाद्यास दुःख देणे म्हणजे भ्रस्टाचार होय. आपल्या वर्तनाने एखाद्यास सुख आनंद देणे म्हणजे शिष्ठाचार आणि पुण्य होय. भ्रस्टाचार म्हणजे पाप ह होय. मग असे जर असेल तर मग कोणतेही क्षत्र असो, व्यक्ती, कुटुंब, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक प्रत्येक क्षत्रात भ्रस्टाचार माजलेला आहे, फारच बोटावर मोजणारे लोक अन्याय करीत नाहीत, शोषण, पिलवणूक करीत नाहीत, मात्र आम जनतेचे वर्तन हे भ्रस्टाचारीच आहे. थोडक्यात ही व्यवस्थाच भ्रस्टाचारी आहे, म्हणून भ्रस्टाचारी अवस्था परिस्थिती आहे. असे कां घडते? याला व्यक्ती कारणीभूत नसतात, माणसे भ्रस्टाचार कां करतात? आम जनता भ्रस्टाचारी कां बनते? याचे मुख्य कारण म्हणजे अस्तित्वात असलेली विषमतावादी व्यवस्था, ज्या व्यवस्थेत भ्रष्टाचारास भरपूर संधी मिळते, चांगले माणसे वाईट होतात, चांगल्या माणसांना जीवन जगणे कठीण जाते, सद्गुनी माणसे अशा व्यवस्थेत गुदमरून मरतात, आणि दुर्गुणी माणसे सुखी जीवन जगत असतात, मानसिक जीवन दुःखी असले तरी दुर्गुणी लोकांचे बहुतेक जीवन हे सुखीच असते. विषमतावादी व्यवस्थेत सद्गुनी माणसं सुद्धा दुर्गुणी बनतात. अशा व्यवस्थेत देवधर्म काहीच करू शकत नाही. अशा संकल्पना सुद्धा कमी पडतात. विषमतावादी व्यवस्थेत भ्रष्टाचार बोकाळलेला असतो. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार म्हणून त्यास मान्यता मिळते, भ्रष्टाचार आणि दुराचार हा नैतिक बनतो, आणि जो भ्रष्टाचार करत नाही आणि जो सद्गुनी आहे, तोच अनैतिक बनतो. अशी ही उलटी रीत विषमतावादी व्यवस्थेची असते. अशा व्यवस्थेत दुराचार्य आणि भ्रष्टाचारी लोकांना रान मोकळे असते, म्हणजेच भ्रष्टाचार आणि अत्याचार अन्याय करायला भरपूर संधी मिळते. सद्गुनी लोकांना पण भ्रष्टाचार आणि अन्याय केल्याशिवाय जीवनच जगता येत नाही, अशी त्यांची कोंडी होते. विषमतावादी व्यवस्थेत स्त्रिया बद्दल दुटप्पी भूमिका घेतली जाते, एकीकडे तिला देवी देवता म्हणून माणसं मान द्यायचा आणि दुसरीकडे तिच्यावर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करायचा अशी परिस्थिती निर्माण होते. त्याला कारण दुर्बुनी व्यक्ती नसून ही विषमतावादी व्यवस्थाच आहे. अशीही विषमतावादी नष्ट करून त्या ठिकाणी समतावादी व्यवस्था स्थापन केल्याशिवाय ही परिस्थिती निवळणार नाही. विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समतावादी व्यवस्था आणण्यासाठी देव आणि धर्म काम करणार नाहीत, कारण यांचा उपयोग विषमतावादी व्यवस्थेसाठीच होत असतो. कारण यातून अंधश्रद्धा निर्माण होते आणि अंधश्रद्धा ही विषमतावादी व्यवस्था पोसन्यास उपयोगीं पडते. अशा व्यवस्थेत देव आणि धर्म करणाऱ्यांना भरपूर प्रसिद्ध मिळते, आणि देवधर मंडळ करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळण्या जात नाही, याचा अर्थ असा होतो की ही व्यवस्था पोहोचण्याचे काम देवाने धर्मांच्या मार्फत केल्या जाते. तुम्ही गरीब किंवा श्रीमंत असण्याचे कारण म्हणजे देव दैव किंवा पुनर्जन्म आहे असे पटविल्या जाते, आणि ते लोकांना लवकर पटते, याचे कारण त्यांची परिस्थिती ही दुर्बल असते, ते परिस्थितीशी सामना करू शकत नाहीत, भ्रष्टाचार यांची ताकद जास्त असते. त्यांच्यापुढे यांची ताकद कमी पडते. म्हणून सामान्य जनता ही देववादी आणि दैववादी बनते, भविष्य आणि चमत्काराच्या आहारी जाते. हे सारे विषमतावादी व्यवस्थेमुळेच घडते. यावर एकच उपाय तो म्हणजे समतावादी व्यवस्था प्रस्थापित करणे. ती कशी करायची याचा मार्ग महामानवांनी सांगितले आहे, त्यांच्याच मार्गाने गेल्याशिवाय पर्याय नाही. आपले दुःख दारिद्र्य अज्ञान दूर करायचे असेल तर आर्थिक आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आणि विचारवंत आणि महामानव यांच्याच मार्गाने जावे लागेल. दुराचारी अन्याय अत्याचारी दुष्ट दुर्जनांना प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा देणारी ही भ्रष्टाचारी व्यवस्था समोर नष्ट केल्याशिवाय सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन येणार नाहीत, भारत देश भ्रष्टाचार मुक्त देश बनवायचा असेल तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. केवळ समतेसाठीच. लेखक: दत्ता तुमवाड, सत्यशोधक समाज नांदेड, दिनांक: 13 मार्च 2026, फोन: 94 20 91 22 झिरो नऊ.

RELATED ARTICLES

Most Popular