लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
गुरूवार, 12 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण नवमी
राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3
आज सकाळी 10 वा पर्यंत चांगला दिवस
आज जन्मलेल्या बाळाची राशी धनू.(मूळ नक्षत्र)
12 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर सर्वार्थाने गुरूग्रहाचा प्रभाव आहे. अधिकार वृत्ती व प्रामाणिकपणा या दोन गोष्टी तुमच्याकडे असतात .महत्त्वकांक्षा असून पोकळ गर्वही आहे. जीवनातील आनंद उपभोगण्याकडे कल असतो. गुप्तकारस्थानामुळे ज्याला काही गमवावे लागले आहे अशा व्यक्तीसाठी तुम्हाला त्याग करायला आवडतो. इतरांना बरोबर तुमचे संबंध हळुवार व संवेदनाशील असतात. तुम्ही उच्च ध्येयवादी असता. बारा अंकात एक हा रवीचा अंक व दोन चंद्राचा अंक आहे त्यामुळे रवि व चंद्र या दोन्ही ग्रहांचा तुमच्यावर परिणाम होतो .उत्तम व्यवस्थापक किंवा प्रशासक म्हणून तुम्ही काम करू शकतात. कला साहित्य, मनोरंजन हे गुण ही तुमच्याकडे असतात .चंद्र ग्रहामुळे मुळे उच्च कल्पनाशक्ती मिळवून तुम्ही उत्तम कथा लेखिका म्हणून नाव मिळू शकतात .पतीला योग्य ती सर्वसाधारण देण्यात तुम्ही वाकबगार असता. गृह कृत्य व मुलाबाळांचे संगोपन करण्यात तुम्ही जागरूक असता. आपल्या पतीला व्यवसायात मनापासून रस घेऊन त्याला मदत करायला आवडते. महत्वकांक्षी असून मान मर्यादा व प्रतिष्ठेला जपणारे असतात. कोणताही प्रश्न अभ्यास पूर्ण रीतीने सोडवता त्याकरता सतत प्रयत्न करतात. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. इतरांच्या भावना सहजपणे समजावून घेतात, सहानुभूती असते, प्रेम असते त्यामुळे इतरांशी संवाद साधणे शक्य होते. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. प्रतिष्ठा जपतात. वृत्ती धार्मिक असते आणि गूढ गोष्टींकडे ओढा असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. स्वभाव उत्साही आहे. कोणतेही प्रश्न तुम्ही अभ्यासपूर्ण रीतीने सोडवतात. दीर्घोउद्योगी आहात. बुद्धिमान आणि संशोधक लोकांकडे तुमचा ओढा असतो. सर्वसाधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे पसंत नसते. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. आत्मविश्वास भरपूर असतो. स्वतःला निर्णयक्षमता असते. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. वृत्ती आनंदी असते. मन तरुण असते. मैदानी आणि शारीरिक खेळांची आवड असते. तुम्ही एक विश्वास पात्र व्यक्ती आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असेल. दिखाऊ पणाची आवड असून पद्धतशीरपणा व टापटीप असतो आनंदी वृत्ती असून मन तरुण असते .चालीरीती पाळण्याची आवड असते .उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची तुमची क्षमता असल्याने पैशाच्या बाबतीत तुम्ही सुखी असता .तुमचे जीवनमान चांगले असले तरी अनावश्यक गोष्टीवर खर्च करीत नाहीत. पैशावर आधारित सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतात.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग – पिवळा, हिरवा, जांभळा.
शुभ रत्न-पुष्कराज
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज नवमस्थानी चन्द्र आहे.
शैक्षणिक यश लाभेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.कुटुंबातील सदस्य किंवा गुरुस्थानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. घरात सकारात्मक वातावरण राहील.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.
काही गोष्टी अचानक बदलू शकतात, त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज सप्तमात चन्द्र आहे.
जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीसोबत छोट्या गोष्टींवर मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे.भागीदारीत किंवा टीमवर्कमध्ये काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. चर्चा आणि संवादातून मार्ग निघेल
♋ कर्क
मैत्रीणींनो आज षष्ठात चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कामाची धावपळ, जबाबदाऱ्या आणि छोट्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज पंचमात चन्द्र आहे.
आज आत्मविश्वास वाढेल.प्रेमसंबंध किंवा कुटुंबातील नातेसंबंधात आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. महिलांसाठी प्रगतीचा दिवस.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.घराशी संबंधित काही कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.
कामाचा ताण जाणवू शकतो. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विश्रांती घेतल्यास मन शांत राहील.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज तृतीयात चन्द्र आहे.मित्रमैत्रिणी किंवा भावंडांशी संवाद वाढेल. छोट्या प्रवासाचे योगही संभवतात. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.आर्थिक बाबी, कुटुंब आणि बोलण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कामात मेहनत वाढेल. संयम ठेवून काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. शांतपणे निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळणे चांगले. कामात थोडी धावपळ होऊ शकते.नात्यात गैरसमज टाळा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज लाभात चन्द्र आहे.
.मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांसोबत संबंध मजबूत होतील. एखादी आनंदाची भेट किंवा कार्यक्रम होऊ शकतो.कामात धाडसाने पाऊल टाकल्यास प्रगतीचे मार्ग खुलतील.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता.मन द्विधा राहील.नोकरी आणि घरकाम यात ओढाताण होऊ शकते.