लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

शनिवार, 7 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण चतुर्थी/पंचमी

राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30

आज चांगला दिवस,
घबाड सकाळी 11:16 नंतर
आज जन्मलेल्या बाळाची राशी तुळ.

7 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरू आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे.  

तुमचे ध्येय व महत्त्वकांक्षा उच्च असतात .तुम्ही निसर्गतः अस्वस्थ असतात. धर्म आणि रूढीये याबाबत ठराविक चाकोरीतून जाणे आवडत नाही. सामर्थ्य व कमकुवता या गोष्टी दोन्ही एकाच वेळेस अनुभव येतात. उच्च कोटीचा अहंकार वैयक्तिकरित्या जोपासता .सर्वसाधारण विचारसरणीच्या किंवा सामान्य माणसं तुम्ही मिसळत नाहीत. पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. आयुष्यात सतत बदल आवडतो. काही वेळा दुराग्रही व दुसऱ्या मता दुसऱ्यांच्या मताची उपेक्षा करतात .आपल्या आवडत्या पुस्तकाबरोबर तासंतास घालवणे तुम्हाला आवडते .स्वतःचे ज्ञान व अधिकारी याची पूर्ण जाणीव तुम्हाला असते .कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी अंतिम गोष्टीचा विचार करता. तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. आवडीची नोकरी मिळाल्यास तुम्हाला चांगला पैसा मिळून स्थिरता प्राप्त होते. जीवनात आराम सर्व सुख सोयी मिळतात .वयाच्या 52 व्या वर्षानंतर आर्थिक स्थैर्य लाभते .बौद्धिक कष्टाचे चीज होते. बराचसा वेळ तुम्ही रिकामपणात घालवता .घराची सजावट खर्चिक पद्धतीने केलेली आवडते .अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडता. मित्र-मैत्रिणींना जेवायला बोलावणे ,मेजवाने देणे, आलेल्याचे आदरातिथ्य करणे तुम्हाला आवडते .तुमच्या नवऱ्याने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे अशी अपेक्षा करता. तुम्ही हुशार असून चांगली गृहिणी म्हणून नावाजली जातात.

शुभ दिवस:- सोमवार,बुधवार ,गुरुवार रविवार

शुभ रंग – हिरवा, पिवळा ,जांभळा

शुभ रत्ने:-पुष्कराज, पाचू किंवा लसण्या
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.
आज महिलांना कामात उत्साह आणि धैर्य मिळेल. एखादे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. मित्रमैत्रिणींच सहकार्य मिळेल.मनोरंजनाकडे कल राहील.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज षष्ठस्थानी चन्द्र आहे.
आज आर्थिक बाबतीत थोडा विचार करून निर्णय घ्या. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबातील महिलांचे सहकार्य मिळेल.
शुभ रंग: पांढरा
उपाय: देवीला सुगंधी फुले अर्पण करा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज पंचमस्थानी चन्द्र आहे.
आज संवादातून फायदा होईल. नवे ओळखी निर्माण होऊ शकतात. नवीन योजना किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे.संतती च्या कलागुणांचे कौतुक होईल.
कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.
शुभ रंग: हिरवा
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.
मनात संवेदनशीलता वाढेल. नातेसंबंधात प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे चांगले.
शुभ रंग: क्रीम
उपाय: चांदीच्या ग्लास मध्ये पाणी प्या.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.
आज आत्मविश्वास वाढलेला असेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. कलाकौशल्य उठून दिसेल,कौतुक होईल.
शुभ रंग: सोनेरी / केशरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.
आज कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. महिलांना योजना पूर्ण करण्यात यश मिळेल.
शुभ रंग: फिकट हिरवा
उपाय: बुध मंत्राचा जप करा.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व आकर्षक वाटेल. महिलांसाठी स्वतःकडे लक्ष देण्याचा चांगला दिवस.कलाकारांना उत्तम दिवस.विचारशक्ती, संवाद आणि निर्णय क्षमता वाढेल.
शुभ रंग: गुलबक्षी
उपाय: लक्ष्मीदेवीला अगरबत्ती अर्पण करा.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज व्ययस्थानी चन्द्र आहे.
आज मन थोडे अंतर्मुख राहू शकते. गुप्त योजना किंवा विचार मनात ठेवणे योग्य ठरेल. शांत राहणे फायदेशीर.
शुभ रंग: मरून
उपाय: शिवलिंगावर पाणी अर्पण करा.

♐ धनु

मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.
मैत्री आणि सामाजिक संबंधातून फायदा मिळेल. महिलांना नवीन संधी किंवा माहिती मिळू शकते.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरूला हरभरा डाळ अर्पण करा.

♑ मकर

मैत्रीणींनो आज दशमात चन्द्र आहे.
करिअर आणि कामात प्रगतीची शक्यता आहे. वरिष्ठांकडून विश्वास मिळेल. संयमाने काम केल्यास लाभ होईल.
शुभ रंग: निळा
उपाय: शनीदेवाला तीळ तेलाचा दिवा लावा.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज भाग्यात चन्द्र आहे.
प्रवास किंवा नवीन ज्ञान मिळण्याची शक्यता आहे. महिलांना आध्यात्मिक किंवा शैक्षणिक गोष्टींत रस वाढेल.
शुभ रंग: जांभळा
उपाय: विष्णू मंदिरात दर्शन घ्या.

♓ मीन

मैत्रीणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.
भावनिक बाबतीत सावध राहा. नातेसंबंधात स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसू शकते.
शुभ रंग: आकाशी
उपाय: देवीला पिवळी फुले अर्पण करा.

RELATED ARTICLES

Most Popular