लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 4/3/2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्री. पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनते साठी घालावा. आपल्या कार्यातून आपला ठसा उमटवा अशी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
लोकशाही व्यवस्थेत विविध पक्षांकडून सक्षम नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची ताकद आहे. राज्यसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात राज्याच्या प्रश्नांना व जनतेच्या अपेक्षांना योग्य न्याय मिळवून देतील तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सकारात्मक व विधायक भूमिका बजावतील, असा विश्वास आहे.
पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!