Homeईपेपरशिक्षक साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा निडेबन.

शिक्षक साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा निडेबन.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 1/3/2026 स्व. शिवराज पाटील चाकूरकर साहित्य नगरी, निडेबन, उदगीर येथे रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाण, उदगीर यांच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा आमदार श्री संजय बनसोडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कर्तव्यदक्ष आमदार अधिवेशन सुरू असताना सुद्धा आपल्या धावपळीच्या वेळात वेळ काढून आपल्या मतदारसंघात कुठलाही कार्यक्रम असो हजर राहतात.घार फिरे अकाशी चित्त तिच्या पिल्लाया पाशी अशा प्रमाणे कार्य करतात. जो काम करतो तोच चर्चेत असतो.

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या साहित्यिक विचारांमधून समाजाला नवी दिशा, नवे भान आणि नवी ऊर्जा मिळते. या संमेलनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या सर्जनशीलतेला आणि साहित्यसेवेला व्यासपीठ उपलब्ध झाले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्या बोलण्यात त्यांनी शिक्षका विषयी आपल्या भाषणांतून भावना व्यक्त केल्या. या सुंदर उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular