Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

शनिवार, 28 फेब्रुवारी 2024. फाल्गुन शुक्ल द्वादशी

राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30

. “आज उत्तम दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क आहे.घबाड 9:35 सकाळ पर्यंत.

28 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि शनि आणि काही प्रमाणात चंद्र ग्रहांचे वर्चस्व आहे.
गुरुच्या कृपेमुळे अनंत अडचणीतून तुम्ही सहजपणे निघून जाऊ शकता .चंद्राच्या प्रभावामुळे स्वप्नाळू स्वभाव असला तरी शनि आणि व गुरु यामुळे त्याला बऱ्याच वेळा आळा घातला जातो. शैक्षणिक संस्था सामाजिक दवाखाने अशा संस्थांशी तुमच्या संबंध येतो .भविष्यात लागणारी पैशाची जपवणूक सावधतेने करावी नाहीतर विश्वासघात होण्याची शक्यता असते. तुम्हाला तुमच्या भावना सहजपणे व्यक्त करता येत नाही .अपेक्षा नसतानाही तुमच्या कौटुंबिक जीवनात घडामोडी घडतात. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असून तुम्ही कृतिशील असता, इतके असूनही नोकरी व्यवसायात बरेच बदल झाल्याचा अनुभव येतो. संवेदनाशील असून बारीक-सारीक गोष्टींनी दुखावले जातात.
तुम्ही स्वतंत्र विचाराचे वृत्तीचे आहात. सतत उद्योगात मग्न राहणे तुम्हाला आवडते. उत्साह स्फूर्ती हे तुमची वैशिष्ट्य असून तुम्ही कला प्रिय पण असता .तुम्ही बुद्धिमान असून मानसन्मान व आदर करण्यात तुम्ही वाकबगार असता .अतिशय भावनाप्रधान असल्यामुळे कोणती गोष्ट मनाला लावून घेतात .आतल्या आवाजाच्या बळावर इतरांच्या मनातले तुम्हाला ओळखता येत. इतरांच्या गुपितांचा तुम्ही उघड करत नाही, त्यांना त्यांच्या निराशेपासून तणावापासून तुम्ही मुक्त करता .त्रयस्थ भूमितीतून तुम्ही इतरांना उत्तम सल्ला देता कोणत्याही प्रकारच्या सामाजिक जीवनात तुम्ही चटकन मिसळतात. तुमचे सामाजिक जीवन जरी मोठ्या प्रमाणावर असले तरी एकाकीपणा जाणवत असतो. आणि ही गोष्ट तुमच्या जवळचे समजू शकत नाहीत. चंद्राच्या प्रभावामुळे कल्पकता आणि चंचलता या गोष्टीचा या अनुभव येतो .एकाच विषयावर फार काळ लक्ष केंद्रित करता येत नाही .सखोल अभ्यास नसतानाही वक्तृत्व शक्तीच्या बळावर तुम्ही इतरांवर सहजपणे छाप टाकतात .तुमच्या बुद्धीचा आणि कार्यक्षमतेचा वापर तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी करता .अतिशय रागीट आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडतो आणि बऱ्याच वेळा अशा लोकांशी तुमचा संबंध येतो. तुम्ही स्वयंकेंद्रित असून इच्छा शक्ती जबरदस्त आहे .तुमचे दुहेरी व्यक्तिमत्व असून एकीकडे व्यवहारी ते दुसरीकडे ध्येयवादी असतात .तुमचे जीवन समाधानी व सुखी असेल. जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आशावादी असतो .स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या स्वभावाचे गुण दोष चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखता .आर्थिक बाबतीत नशीबवान असता तुम्हाला आरामशीर जीवन जगणे आवडते. कार्यक्षम ,बुद्धिमान व घर कामात कुशल असतात. पतीला सर्व प्रकारे साथ देता. तुम्ही निष्ठावान व दयाळू असता कौटुंबिक परिस्थितीशी जुळवून घेता. नृत्य व संगीत यांचे तुम्ही शौकीन आहात. आपले वैवाहिक जीवन सुखी असते परंतु वैवाहिक साथीदाराची निवड योग्य रीतीने करावी.त्यांनी आपल्या साथीदार आपल्यासारखाच उत्साही ,सौंदर्य प्रेमी, पोशाखाची आवड असलेला घरात समाजात मिसळण्याची आवड असणारा निवडावा.
शुभ दिवस – सोमवार, शुक्रवार, शनिवार.

शुभरंग – निळा

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
घरगुती विषयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबातील मोठ्यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
करिअर मध्ये प्रगती.
आर्थिक: अचानक छोटा लाभ.
जोडीदाराला वेळ द्या.
आरोग्याची काळजी घ्या.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
संवादातून कामे पूर्ण होतील. लेखन, शिक्षण, मार्केटिंग क्षेत्रात यश.
आर्थिक गुंतवणुकीत फायदा.
प्रेमात गोड संवाद नाते मजबूत करेल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
बुध-शुक्र युतीमुळे आर्थिक विषय अनुकूल. उत्पन्नवाढीची संधी.
सर्जनशील कामात यश.
विरुद्धलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाढेल.
आरोग्य सांभाळा.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
आर्थिक निर्णय लाभदायक ठरतील .
जोडीदाराशी भावनिक जवळीक वाढेल.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
मन थोडे भावनिक राहील. एकांतात विचार करण्याची गरज भासेल.
आर्थिक खर्च वाढू शकतो.
पतीसोबत गैरसमज टाळा.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज लाभास्थानी चन्द्र आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग.
मित्रपरिवारातून लाभ. नवीन ओळखी फायदेशीर.
टीमवर्कमध्ये यश.
जोडीदारासोबत आनंददायी दिवस व्यतीत कराल.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. शनी त्रिकोणामुळे मेहनतीचे फळ मिळेल.
आर्थिक स्थिरता लाभेल.
प्रेमात संयम ठेवा.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
भाग्याची साथ. प्रवास किंवा धार्मिक कार्यासाठी उत्तम दिवस. अचानक लाभ.
रोमँटिक वातावरण अनुभवाल.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
भावनिक चढउतार संभव. आर्थिक व्यवहारात सावधगिरी.
गुप्त योजना यशस्वी ठरतील.
जोडीदाराशी स्पष्ट संवाद आवश्यक.

♑ मकर
भागीदारीत लाभ. विवाह इच्छुकांना खूष खबर मिळु शकते.
आर्थिक करार फायदेशीर.
प्रेमात गोडवा वाढेल.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
आरोग्य व दिनचर्येत सुधारणा आवश्यक. कामात शिस्त ठेवा.
आर्थिक लाभ होतील.
प्रेमात न आवडणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
घर, मालमत्ता, कुटुंब विषय अनुकूल. आईकडून शुभ बातमी मिळू शकते. घरगुती खर्च वाढेल पण समाधान मिळेल.
भावनिक जवळीक वाढेल.

RELATED ARTICLES

Most Popular