महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर शनिवार, 21 फेब्रुवारी 2026. फाल्गुन शुक्ल चतुर्थी,विनायकी चतुर्थी

राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30

आज दुपारी 1 नंतर चांगला दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास मीन/संध्याकाळी 7:07 नंतर मेष.
(विष्टी करण शांती)

21 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शनि आणि गुरू ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुम्ही प्रेमळ व दयाळू माता म्हणून ओळखले जाता. आयुष्यात शेवटी शेवटी प्रसिद्धी व मान मरातब मिळतो .तुमचा स्वभाव अस्थिर व चंचल असून झोप सावध असते.तुमचे विचार कृतीत ताबडतोब आणण्याची प्रवृत्ती असेल. स्वभावाचे अनेक चांगले पैलू असूनही संशयी वृत्ती असते .तुमच्या स्वभाव महत्त्वकांक्षी असून नेतृत्व गुण असतात .धर्माबरोबर ओढ असते मात्र कर्मकांडावर विश्वास नसतो .स्वतःच्या ज्ञानाविषयी आत्मविश्वासाबरोबर गर्विष्ठ पणाचा दोष प्राप्त होतो .तुमचे आचार विचार आदरणीय असतात निसर्गप्रेमी असून उत्साही असता. न्यायाची आवड असते .दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट करण्यास सदैव तयार असतात. तुम्ही सतत अस्वस्थ असता.भावनांचा प्रभाव असल्यामुळे फार लवकर कष्ट होतात .समाजात मिसळणे ,मित्रपरिवार असणे हे तुमचे नित्याचे आहे .परंतु इतके असूनही तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवते .तुम्हाला संधी प्राप्त झाल्यास तुमचे गुण व पात्रता याविषयी लोक आश्चर्यचकित होतात .आपले नाव अजरामर व्हावे या दृष्टीने संशोधन वृत्ती असते .जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याचा ध्यास असतो. इतरांची निराशा दूर करून त्यांना आत्मविश्वास देता .तुम्ही मनाने मोठे सहनशील, विनोदी व विश्वासू असतात. द्वेष ,मत्सर यापासून दूर राहता .मोठ्याने बोलण्याची सवय असते. दिखाऊपणाचा छंद असतो. यांच्या भावना स्वयं प्रेरित असतात .भावना मोकळेपणाने व्यक्त करतात . संभाषण चतुर असतात .खेळाची आवड असून सामाजिक कार्यात रस असतो. आर्थिक दृष्ट्या नशीबवान असतात. तुम्ही अतिशय प्रेमळ व निष्ठावान असता.तुमच्या स्वभाव लहरी असून वृत्ती ने हळव्या असतात.काही वेळा बरोबरीचा किंवा वयाने लहानपण असू शकतो .कौटुंबिक जीवनात कमालीचे समरस झालेले असत. पतीला सर्व ती योग्य साथ देण्यास तुम्ही वाकबगार असतात .उत्तम सहज धर्म चारिणी म्हणून लौकिक मिळवता.

शुभरंग – पिवळा आणि हिरवा
शुभ वार- मंगळवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रत्न- लसण्या,हिरा,पुष्कराज(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज सकाळ च्या सत्रात चीडचीड वाढेल,मनावर नियंत्रण ठेवा.
संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल — ऊर्जा वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
आर्थिक उन्नती होईल. घरगुती वातावरण सुखद राहील. भावनिक निर्णय टाळा.संध्याकाळी घरात वातावरण शांत ठेवा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कामात वेग येईल. महिलांसाठी सामाजिक सन्मान वाढेल.संध्याकाळी आर्थिक लाभ होइल.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
कामाचा उत्साह वाढेल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण मिळतील. आर्थिक लाभ संभवतो.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज कामात पुढाकार घ्याल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे. धाडसी निर्णय फायदेशीर.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
कामात यश मिळेल. आरोग्य सुधारेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. सौंदर्य, कला क्षेत्रात लाभ. मन प्रसन्न राहील.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
आज धाडस वाढेल. अडचणींवर मात कराल. संध्याकाळनंतर महत्वाचे निर्णय घ्या.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
भाग्य साथ देईल. प्रवास योग किंवा नवीन संधी संभवते. आर्थिक लाभ.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
कामात मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज आर्थिक लाभ होतील.राग टाळा.
नवीन कल्पना यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य लाभदायक.

♓ मीन

मैत्रीणींनो आज दिवसभर तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.लक्ष्मी प्राप्ती चे योग.
आत्मिक शांती, प्रेमात समाधान. संध्याकाळनंतर थोडी अस्वस्थता संभवत.

RELATED ARTICLES

Most Popular