लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026. फाल्गुन शुक्ल तृतीया
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
आज शुभ दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मीन आहे.
20 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनि आणि चंद्र ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुमच्या भाग्योदय समुद्र नदी तलाव अशा पाण्याच्या जवळ होतो. दुसऱ्याला मदत करण्यात नेहमी पुढे असता. लोकांच्या कल्याणासाठी नवीन कल्पना योजना राबवता. उत्तम तऱ्हेचे लिखाण करण्याची क्षमता असून लेखीका म्हणून प्रसिद्धी मिळू शकतात. तुम्ही ममताळ व सहृदयी आहात. तुमचा मैत्र परिवार फार मोठा असतो .श्रीमंत व विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून फायदा होतो .तुम्ही ध्येय वादी असून तुमच्या प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे .तुमच्या स्वभाव स्वप्नाळू आहे. इतरांनी तयार केलेल्या कामाचे तुम्ही प्रत्यक्ष रूपांतर करू शकता.. तुम्ही योग्य तऱ्हेने विचार करणारे निस्वार्थी व विचारवंत असून दुसऱ्यांच्या भावनांची कदर असते. उत्तम सहचारी व सहकारी म्हणून तुम्ही गौरवले जातात. चांगले किंवा वाईट जाणण्याची निसर्गतः क्षमता असते. कोणत्याही कामातील सर्व बारीक-सारी गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात उतरवता. व्यवस्थितपण, टापटीप हे गुण असून शिस्तबद्ध योजना अस्तित्वात आणता. तुम्ही स्वतःच्या कल्पनेत सतत दंग असल्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनाचा अभाव असतो. बराच वेळा समाजापासून एकटे राहण्यात स्वतःचे स्वप्न रंगवण्यात तुम्हाला आनंद वाटतो .तुमच्या इतकी कल्पनाशक्ती दुसऱ्या कोणातही क्वचित आढळते. निसर्ग सौंदर्य, समुद्र ,फुले आकाशात यांच्याशी एकरूप होणे तुम्हाला प्रिय असते. तुमच्या स्वभाव अस्थिर, चंचल असून जीवनात सतत बदल झालेला आवडतो. प्रवासाची आवड असून लांबचे प्रवास अधिक सुखकारक वाटतात. दुसऱ्याला आकर्षण घेण्याची एक सुप्त संमोहन शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे असून इतरांची ढवळाढवळ आवडत नाही. कौटुंबिक जीवनात तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला शारीरिक कष्टाची फारशी आवड नसते. तुम्ही प्रेमळ, आपुलकी दाखवणाऱ्या व निष्ठावान आहात. पतीकडून मिळालेल्या सुखसोयीत तुम्ही समाधानी असतात. तुमच्याकडे लहरीपणा आहे. वैभवशाली जीवनाची तुम्हाला ओढ असते. घरात आनंद व शांतता ठेवण्याकडे तुमची वृत्ती असते. उत्तम कल्पनाशक्ती, वाङ्मयीन कृतीशीलता ,भाषाप्रभुत्व आहे शिवाय जे लोक बुद्धिमान असून प्रवासाची आवड आहे अशा बद्दल तुम्हाला ओढ असते.
शुभरंग – पांढरा, जांभळा
शुभ वार-सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार
शुभ रत्न- मोती,हिरा,पुष्कराज(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज अंतर्मनाचा आवाज ऐका. कामात शांतपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ संभवतो.धार्मिक कार्यात भाग घ्याल.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
घरात आनंदी वातावरण राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पैशांची आवक वाढेल.मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन आनंदी राहील.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज मन उत्साही राहील.
संवादातून लाभ. नवीन योजना यशस्वी होतील. विद्यार्थिनींसाठी चांगला दिवस.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
भावनिक समाधान मिळेल. आई किंवा ज्येष्ठ स्त्रीकडून मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल.धर्म कार्यात भाग घ्याल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
प्रतिष्ठा वाढेल. मान मिळेल.वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नेतृत्वगुण प्रकट होतील.अचानक लाभ होतील.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
कामात अचूकता आणि यश मिळेल. नवीन तंत्र वापराल.आरोग्य सुधारेल.समारंभात सहभागी व्हाल.नात्यात भेटीगाठी होतील. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
प्रेमात यश. सौंदर्य आणि सर्जनशील कामात यश. आर्थिक लाभ संभवतो.आरोग्याची काळजी घ्या.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आज मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. अडकलेले काम पूर्ण होईल.विध्यार्थीनींना,कलाकारांना छान दिवस.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
भाग्य साथ देईल. शिक्षण, प्रवास आणि करिअरमध्ये यश. नवीन संधी मिळेल.नवीन ओळखी होतील.
♑ मकर
मैत्रीणींनो
जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून लाभ मिळेल. पतीचे सहकार्य मिळेल.कागदपत्रे कामात लाभ होईल.इतरांवर प्रभाव राहील.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. अचानक लाभ संभवतो.जिवलगा बरोबर फेरफटका माराल.सुरूची भोजनाचा आस्वाद घ्याल.
♓ मीन
मैत्रीणींनो
आजचा दिवस तुमच्या साठी अत्यंत शुभ आहे.
आध्यात्मिक शांती, प्रेमात समाधान आणि आर्थिक लाभ मिळेल. मनाप्रमाणे कामे झाल्याने आत्मविश्वास वाढेल.