Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

बुधवार, 18 फेब्रुवारी 2026. फाल्गुन शुक्ल प्रतिपदा,सौर वसंत ऋतू प्रारंभ

राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30

आज उत्तम दिवस आहे.सौर वसंत ऋतू आरंभ
आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ आहे.

18 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शनि आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे.
तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे जबरदस्त स्वतंत्र वृत्ती ,धाडसी पणा व करारीपणा असतो. चिकटपणा असल्यामुळे कोणतेही अडचणीवर मात करता. तुम्ही निर्णय आहात व वडिलोपार्जित संपत्ती मध्ये तुम्हाला वाटा मिळतो .शिस्तप्रिय असून दुसऱ्याला मदत करायला आवडते. सतत कामात मग्न राहून योग्य निर्णय घेऊ शकतात .तुमची प्रकृती सुदृढ असते .दुसऱ्यावर हुकूमत गाजवणे आवडते, परंतु दुसऱ्याने दिलेला सल्ला आवडत नाही स्मरणशक्ती दांडगी असते .आक्रमकता, प्रतिकार ,धाडस तत्परता असते. तुम्ही लढाउ वृत्तीचे आहात. कितीही विरुद्ध परिस्थितीत सुद्धा तुम्ही ठाम उभे राहता .पराभव तुम्हाला माहित नाही.ध्येय पुर्ती झाल्याशिवाय थांबत नाही. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो पण तो तुमचा उद्देश मात्र चांगला असतो .भावना शील नसता. तुम्ही तापट व धाडसी आहात .उद्धटपणा व जोर शेवटपर्यंत राहतो .शक्यतो दुसऱ्यावर टीका करायचे टाळावे. खेळाची व शक्तिशाली व्यायामाची आवड असते. शूर असल्याने भांडणातला घाबरत नाही मित्रांबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने सुद्धा लढता. दुबळ्या लोकांबद्दल दया व आदर असतो .मुले व प्राणी प्रिय असतात. तुमच्या कडे नैतिक धैर्य आहे .मनाची शक्ती जोरदार असून गुढ अनुभव येतात. प्रवास खूप कराल त्यामुळे सहनशीलता व आपलेपणा निर्माण होतो .तुम्ही विचारवंत व अभ्यासू वृत्तीचे असतात. लोकांपेक्षा तुमचे विचार काळाच्या पुढे असतात त्यामुळे लोक तुमचा सल्ला घेतात. नातेवाईकांना किंवा मित्रांना पैशाची मदत करताना विचारपूर्वक करावी. महत्त्वकांक्षी माणसाची तुम्ही उत्तम पत्नी होऊ शकतात. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यशस्वी होता. पती ला त्याच्या व्यवसायात मदत करतात .त्या शिवाय स्वतःही नोकरी व्यवसाय करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.

शुभ रंग:-राखाडी,जांभळा

शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, गुरूवार

शुभ रत्न:-पुष्कराज, हिरा,अमेस्थिस्ट(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज लाभ स्थानी चन्द्र आहे.विवाह इच्छुकांना गोड बातमी मिळेल.मैत्रिणीसोबत मौजमजा कराल,सहली घडतील.
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल व वरिष्ठांचे कौतुक होईल. प्रेमात आनंदाचे क्षण.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज प्रवास कार्यसाधक होईल.
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. घरात सुख-शांती राहील. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
बोलण्यात गोडवा राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. विद्यार्थिनींसाठी उत्तम दिवस.दूरचे प्रवास ठरतील.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
भावनिक समाधान मिळेल. कुटुंबाकडून प्रेम आणि आधार मिळेल. आर्थिक चिंता कमी होतील.सासुरवाडी कडून लाभ होतील.विमा तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ होतील.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज जोडीदारासोबत रोमँटिक क्षण व्यतीत कराल.पतीची साथ लाभेल.
आज नेतृत्वगुण चमकतील. नवीन संधी मिळू शकते. आत्मविश्वास प्रचंड वाढेल.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज कामाच्या ठिकाणी महिला सहकारी मदत करतील.कामानिमित्त प्रवास घडेल.त्यातून लाभ होईल.
कामात अचूकता आणि यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
प्रेम, सौंदर्य आणि आनंद वाढेल. नातेसंबंध सुधारतील. महिलांसाठी खास शुभ दिवस.प्रेमात यश.विवाह इच्छुकांना छान बातमी मिळेल.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
आत्मविश्वास वाढेल. जुनी अडचण सुटेल. आर्थिक लाभ संभवतो.वाहन सौख्य लाभेल.घरात सजावटीत बदल कराल.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
भाग्य साथ देईल. शिक्षण, करिअर आणि प्रवासात यश मिळेल.पत्र,ई-मेल द्वारे शुभ समाचार मिळेल.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून मान-सन्मान. स्थैर्य वाढेल.गायन क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.कलाकार चमकतील.

♒ कुंभ

मैत्रीणींनो
आजचा दिवस तुमच्यासाठी फार भाग्यवान आहे.
नवीन कल्पना यशस्वी होतील, आर्थिक लाभ होईल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.

♓ मीमैत्रीणींनो आज आर्थिक लाभ होतील.
मन प्रसन्न राहील. प्रेमात मधुरता वाढेल. आध्यात्मिक समाधान मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular