लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 17/2/2026
उदगीर बसस्थानक गेल्या वर्षभरापासून सर्व सोईसुविधा युक्त बसस्थानकाचे काम चालू असून यामध्ये राहिलेल्या सुविधा व उदगीर व जळकोट मतदार संघात जनतसाठी .लालपरी बसेसची कमतरता आदीसह राहिलेले उर्वरित प्रश्न तात्काळ सोडून उदगीर व जळकोट मतदार संघातील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असुन उदगीर येथील बसस्थानक वाढीव कामासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उदगीर मतदार संघ हा तीन राज्याच्या सीमेवर असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
या निधीमुळे उदगीर येथील बसस्थानकाचे काम लवकर होवून प्रवाशांच्या सेवेत सर्व सोईसुविधा बसस्थानक निर्माण होणार आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची सोय होईल असा विश्वास जनतेतून होत आहे.
याचबरोबर महामंडळाच्या उपलब्ध असणाऱ्या बसेस ह्या कमी पडत आहेत तर काही बसेस नादुरुस्त व काही मोडकळीस आले असल्याने या भागातील प्रवाशांना प्रवास करताना अडचण निर्माण होत आहे. उदगीर व जळकोट शहरात बस स्थानकाचे काम सुरू असून त्या कामाचा आढावा घेऊन राहिलेले उर्वरित प्रश्न सोडवणार असल्याचेही आ.संजय बनसोडे यांच्या सुत्रांकडून माहिती दिली.
उदगीर बसस्थानकाला निधी मंजूर केल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत तर उदगीर बसस्थानकाला निधी मंजूर करुन घेतल्याबद्दल आ.संजय बनसोडे यांचे उदगीर मतदार संघातील जनतेने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.