लातूर संपादक अंबादास वसंतराव टाकळीकर10 फेब्रुवारी 2026. माघ कृष्ण अष्टमी/नवमी
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
आज चांगला दिवस आहे.आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक आहे.
10 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि शनि आणि काही प्रमाणात चंद्र ग्रहांचे वर्चस्व आहे.
दुसऱ्याची झटकन परीक्षा करण्याचे ज्ञान तुमच्याकडे उपजत आहे. पुढे येण्यासाठी दुसऱ्या कोणाकडून तरी संधी लाभावी लागते ,त्यानंतर मात्र तुम्ही घवघवीत यश मिळवता. तुम्हाला घराचा फारसा ओढा नसतो. मोठेपणा व प्रतिष्ठा या गोष्टींची आवड असते .बऱ्याच वेळा वडिलोपार्जित इस्टेट किंवा पैसा याचा फायदा होतो. धंद्यात व नोकरीत चांगले यश मिळते .दुसऱ्याला मदत करण्यास तुम्ही तत्पर असता, परंतु इतरांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. तुमचा उत्कर्ष वयाच्या 28 व्या वर्षापासून होतो.
तुम्ही स्वतंत्र विचाराचे वृत्तीचे आहात. सतत उद्योगात मग्न राहणे तुम्हाला आवडते. उत्साह स्फूर्ती हे तुमची वैशिष्ट्य असून तुम्ही कला प्रिय पण असता .तुम्ही बुद्धिमान असून मानसन्मान व आदर करण्यात तुम्ही वाकबगार असता .अतिशय भावनाप्रधान असल्यामुळे कोणती गोष्ट मनाला लावून घेतात .आतल्या आवाजाच्या बळावर इतरांच्या मनातले तुम्हाला ओळखता येत. इतरांच्या गुपितांचा तुम्ही उघड करत नाही, त्यांना त्यांच्या निराशेपासून तणावापासून तुम्ही मुक्त करता .त्रयस्थ भूमितीतून तुम्ही इतरांना उत्तम सल्ला देता कोणत्याही प्रकारच्या सामाजिक जीवनात तुम्ही चटकन मिसळतात. तुमचे सामाजिक जीवन जरी मोठ्या प्रमाणावर असले तरी एकाकीपणा जाणवत असतो. आणि ही गोष्ट तुमच्या जवळचे समजू शकत नाहीत. चंद्राच्या प्रभावामुळे कल्पकता आणि चंचलता या गोष्टीचा या अनुभव येतो .एकाच विषयावर फार काळ लक्ष केंद्रित करता येत नाही .सखोल अभ्यास नसतानाही वक्तृत्व शक्तीच्या बळावर तुम्ही इतरांवर सहजपणे छाप टाकतात .तुमच्या बुद्धीचा आणि कार्यक्षमतेचा वापर तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी करता .अतिशय रागीट आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडतो आणि बऱ्याच वेळा अशा लोकांशी तुमचा संबंध येतो. तुम्ही स्वयंकेंद्रित असून इच्छा शक्ती जबरदस्त आहे .तुमचे दुहेरी व्यक्तिमत्व असून एकीकडे व्यवहारी ते दुसरीकडे ध्येयवादी असतात .तुमचे जीवन समाधानी व सुखी असेल. जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आशावादी असतो .स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या स्वभावाचे गुण दोष चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखता .आर्थिक बाबतीत नशीबवान असता तुम्हाला आरामशीर जीवन जगणे आवडते. कार्यक्षम ,बुद्धिमान व घर कामात कुशल असतात. पतीला सर्व प्रकारे साथ देता. तुम्ही निष्ठावान व दयाळू असता कौटुंबिक परिस्थितीशी जुळवून घेता. नृत्य व संगीत यांचे तुम्ही शौकीन आहात. आपले वैवाहिक जीवन सुखी असते परंतु वैवाहिक साथीदाराची निवड योग्य रीतीने करावी.त्यांनी आपल्या साथीदार आपल्यासारखाच उत्साही ,सौंदर्य प्रेमी, पोशाखाची आवड असलेला घरात समाजात मिसळण्याची आवड असणारा निवडावा.
शुभ दिवस – रविवार, बुधवार, गुरुवार, शनिवार
शुभरंग – नारिंगी, जांभळा, करडा
शुभ रत्न:- माणिक,हिरा,पुष्कराज, अमेस्थिस्ट
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.आज मनात अस्वस्थता जाणवेल, पण संवादातून प्रश्न सुटतील. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवल्यास नात्यांत सुधारणा होईल.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
प्रेम, मैत्री आणि नात्यांत बदल संभवतो. नवीन संधी चालुन येतील.आर्थिक बाबतीत अचानक निर्णय टाळा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
गोड बोलून कामात यश मिळेल.ऑफिस, शिक्षण, व्यवहारात यशदायक दिवस.स्पष्टपणे मत व्यक्त कराल.अविवाहित तरुणींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.अचानक छोटे खर्च उदभवण्याची शक्यता.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
संतती साठी खर्च कराल. कौटुंबिक सौदाहार्य वाढेल. अध्यात्मिक शांतता मिळेल.आई-मुलीचे नाते विशेष घट्ट होईल.कष्टाचे फळ मिळेल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज घर-कुटुंब आणि काम दोन्ही बाजूंनी लक्ष द्यावं लागेल. काही निर्णय कठीण वाटतील पण तेच पुढे फायदेशीर ठरतील.
अचानक जबाबदारी वाढेल. पण त्यातूनच प्रगती होईल. महिलांसाठी शक्ती वाढवणारा दिवस.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
कामात लक्ष केंद्रित होईल.अचूकता वाढेल.जोडीदाराच्या नात्यांत विश्वास वाटेल. मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
भावनिक समतोल साधाल. प्रेमात स्थिरता येईल. महिलांसाठी मन प्रसन्न करणारा दिवस.जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्याच राशीत आत्मविश्वास वाढेल.तणाव कमी होतील.स्वतःसाठी खर्च कराल.प्रवासाचे योग. आज स्वतःबद्दल मोठा निर्णय घेण्याचा दिवस ठरू शकतो.निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरेल.
जोडीदाराशी भावनिक जवळीक वाढेल.
♐ धनू
मैत्रीणींनो आज
अचानक एखादी बातमी,ई-मेल मिळेल किंवा प्रवास योग. निर्णय घाईने नको.काही गोष्टी अचानक उघड होतील — ज्या तुमच्या फायद्याच्या ठरतील.संशयी वृत्ती टाळा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.
संयम आणि शिस्त तुमचं यश ठरवतील. कामात मानसन्मान मिळेल.बढतीची शक्यता.प्रगतीचा दिवस.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
हर्शल प्रति-युतीमुळे कामकाजात अचानक बदल होइल. प्रवास घडेल. करिअर किंवा नात्यात वळण येईल.नवीन जबाबदारी
तुमच्या कल्पनांना मान मिळेल.नात्यात सुसंवाद घडेल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
खरे खोटया तला फरक पटकन ओळखाल.कामात प्रशंसा होईल ध्यान,प्राणायाम उपयुक्त ठरेल.