लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार शुक्रवार, 30 जानेवारी 2026. माघ शुक्ल द्वादशी/त्रयोदशी शुक्रप्रदोष
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
आज संध्याकाळी 5 नंतर चांगला दिवस आहे. आज जन्मलेल्या बाळाची रस मिथुन असून वैदृती योग शांती करणे.
30 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे.तुमच्याकडे आशावाद, उदार पणा असून नशीबवान आहात.धार्मिक पणा ही असतो.प्रवासाची आवड असते.विशेषतः निरनिराळ्या यात्रास्थाने पहाणे पसंद करता. शिक्षक, व्यवस्थापन अधिकारी आशा कामात यश मिळते.तुम्ही शांत व प्रामाणिक असता.कामात मग्न असला तरीही मनातुन अस्वस्थ राहता. अडचणींना जोरदार प्रतिकार करता.आर्थिक दृष्टीने नशीबवान असता.जीवन सुखकारक जाईल या कडे अधिक लक्ष देत.
नैतिकता, शुद्ध प्रेम, दया, न्याय परोपकार व दुसऱ्याला मदत करण्यासाठी गुरु हा ग्रह प्रसिद्ध आहे .दुसऱ्यांबरोबर सुसंवाद साधने तुम्हाला सहज शक्य होते. तुम्ही दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट करणे तयार असता .चांगल्या अर्थाने तुम्ही धर्म पाळता परंतु काही वेळा त्यात अतिरेक दिसतो. नैतिक मूल्यांबद्दल न्याय ,दयाळु पणा यांचे योग्य पृथक्करण केल्यामुळे तुमच्या कोणत्याही कृतीबद्दल संयम असतो, क्वचित प्रसंगी तुम्ही साशंक वृत्तीने आणि भावनेच्या आहारी जातात .तुमच्यामध्ये इच्छाशक्ती, उत्साह ,दीर्घ प्रयत्न असतात. कोणतेही प्रश्न अभ्यासपूर्ण व पद्धतशीरपणे सोडवले जातात. तुम्हाला स्वतःचे काम स्वतः करायला आवडते. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली आवडत नाही .तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. ज्यावेळी तुम्हाला तुमची कल्पना विचार अमलात आणायचे असतात त्यावेळेस तुम्हाला एकटे राहणे आवडते..साधारणता बुद्धिमान हुशार ,सखोल अभ्यास करणाऱ्या व्यक्तीकडे तुमचा ओढा असतो. सर्वसाधारण व्यक्तींमध्ये मिसळणे तुम्हाला अवघड जाते. तुम्हाला जीवनात यश मिळते .तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे सतत उत्कर्ष होतो. न्याय पूर्ण ,दया पूर्ण निर्णय देणारे न्यायाधीश, धर्मगुरू ,शिक्षक ,तत्त्वज्ञानी असे लोक तुमच्या तारखेत मोडतात .गुरुग्रह शुभ् असल्यामुळे तुमच्यामध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्व व विश्वास आहे. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. थोडी दिखाऊपणा आवड असून न्याय, पद्धतशिरपणा ,टापटीपणा या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. तुमचे मन तरुण असून वृत्ती आनंदी आहे .चालीरीती पाळण्याची आवड आहे. तुम्हाला मैदानी व शारीरिक खेळांची आवड असते. तुम्ही उदाहरणे उत्साही आणि दुसऱ्याच्या विश्वासात पात्र असतात. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहिले पाहिजे .थोडक्यात महत्वकांक्षी नेतृत्व करण्याची आवड ,सभ्यपणा ,प्रामाणिकता सामाजिक स्थान, धार्मिकता गर्विष्ठपण ,निसर्गा विषयी प्रेम, उत्साह वृत्ती औदार्य, आदर इत्यादी गुण तुमच्यात आहे. व प्रयत्नांनी तुम्ही आयुष्यात वर येता परंतु इतरांचा मत्सर विरोधी याला प्रतिकार करावा लागतो .उत्तम सह-धर्मचारिणी म्हणून तुम्ही मान्यता मिळवता. आपल्या पतीला योग्य ती साथ देता. पतीच्या व्यवसायात मनापासून मदत करायला आवडते.आर्थिक बाबतीत सुखी असता.जीवन सुखी राहील ह्याकडे अधिक लक्ष देता. उच्च श्रेणीचा व्यवसाय/नोकरी मिळाल्याने पैसा मिळतो.पण शनी ग्रहामुळे अडचणी व विलंब याचा ही अनुभव येतो.चुकूनही व्याजाने पैसे देऊ नये,परत मिळत नाहित.
शुभ दिवस:गुरुवार,मंगळवार, शुक्रवार
शुभ रंग: पिवळा आणि त्या रंगाच्या सर्व छटा, जांभळा आणि त्या रंगाच्या सर्व छटा
शुभ रत्न:पुष्कराज, लसण्या, चंद्र खडा(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज बोलताना गैरसमज होऊ शकतात. घाईने निर्णय घेऊ नका. कामात दबाव जाणवेल, पण संयम ठेवल्यास मार्ग सापडेल.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमान चालिसा पठण
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक विषयात सावधगिरी आवश्यक. खर्च वाढू शकतो. कुटुंबात मतभेद टाळा. महिलांसाठी आज शांत राहणे हिताचे.
शुभ रंग: पांढरा
उपाय: महालक्ष्मीचे स्मरण करा
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने विचार वेगवान, पण मन अस्थिर. सरकारी नियम पाळा.बुध-गुरू षडाष्टकामुळे संभ्रम वाढू शकतो. निर्णय थोडा पुढे ढकला.
शुभ रंग: हिरवा
उपाय: गणपती उपासना करा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
व्यय स्थानी चन्द्र आहे.मनाला विनाकारण चिंता वाटेल. स्वतःला थोडा वेळ द्या.
शुभ रंग: पांढरट
उपाय: ध्यान धारणा ,प्राणायाम करा.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी अहंकारामुळे तणाव वाढू शकतो. वरिष्ठांशी वाद टाळा. महिलांसाठी संयम फार महत्त्वाचा.
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
काम आणि आरोग्य दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. अति विचारामुळे थकवा जाणवेल. ध्यान उपयुक्त ठरेल.
शुभ रंग: निळा
उपाय: विष्णू सहस्रनाम ऐका.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधांत संवादाचा अभाव जाणवू शकतो. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोला. सौम्य वर्तन ठेवा.
शुभ रंग: किरमिजी
उपाय: विष्णू लक्ष्मी दर्शन घ्या.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
भावना तीव्र राहतील. आत साठलेला राग बाहेर येऊ शकतो. स्वतःवर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग: जांभळा
उपाय: दुर्गा देवीचे स्मरण करा
♐ धनु
मैत्रीणींनो आज
गुरू षडाष्टक बुधमुळे मार्गदर्शन विरुद्ध विचार मिळू शकतात. निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरू दत्त उपसना करा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
कामाचा ताण आणि मानसिक दबाव वाढू शकतो. शिस्त आणि संयमाने दिवस हाताळा.
शुभ रंग: तपकिरी
उपाय: उडीद डाळ दान करा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
विचार आणि भावना यांचा संघर्ष जाणवेल. मैत्रिणींशी बोलून मन हलके होईल.मंत्र तंत्र यात मन रमेल.देव दर्शन घडेल.
शुभ रंग: आकाशी निळा
उपाय: ध्यान व प्राणायाम करा
♓ मीन
मैत्रीणींनो आज
आतल्या आवाजाचे ऐका पण व्यवहारिकता कमी पडू शकते. भावनांवर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग: समुद्री हिर