Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार मंगळवार, 20 जानेवारी 2026. माघ शुक्ल द्वितीया

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30

आज उत्तम दिवस आहे. *आज जन्मलेल्या बाळाची रास मकर /रात्री 1:36 नंतर कुंभ

20 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर चंद्र आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे. तुमचा मित्रपरिवार खूप मोठा असतो. श्रीमंत व विरुद्ध लिंगी व्यक्तींकडून फायदा होतो. तुमच्याजवळ लिहिण्याची प्रतिभा असते. तुम्ही लेखक किंवा कादंबरीकार म्हणून प्रसिद्धीस येऊ शकतात. तुमचा उत्कर्ष पाण्याच्या ठिकाणी उदा. नदी समुद्राजवळ असतो. लोकांसाठी सतत झटत असतात.
तुमच्या उत्कृष्ट कल्पनाशक्ती असून तुम्ही ध्येयवादी व स्वप्नाळू स्वभावाचे आहात .स्वप्नाळू स्वभावामुळे निर्णय घेण्यास थोडासा उशीर लागतो .जरी तुम्ही सतत सावध असलात तरी तुमच्यात व्यावहारिक बाजूचा अभाव असतो. स्वप्नाळू स्वभावामुळे तुमचा तर्क नेहमी तत्वाला धरून असेलच असे नाही .उच्च बौद्धिक पातळीमुळे दुसऱ्यांबरोबर राहणे तुम्हाला फारसे पसंत नसते. इतके असूनही तुमच्या सामाजिक दृष्टिकोनामुळे तुम्हीच लोकांमध्ये सामावलेले आहात. असे वाटते तुम्ही मायाळू असून लोकप्रिय होता .तुम्ही उद्या स्वभावाचे असून जिल्हा विरुद्ध फारच थोडा प्रतिकार करतात. समुद्र ,फुले ,सृष्टी ,सौंदर्य आकाशाचा विशाल पणा यासारख्या नैसर्गिक सौंदर्याचे तुम्हाला आकर्षण असते. समुद्राच्या सहवासात तुम्ही रमून जातात .तुमच्या स्वभाव अस्थिर व चंचल असून जीवनात सतत बदल झालेला आवडतो .प्रवासाची आवड असून लांबचे प्रवास अधिक सुखकारक वाटतात. हवेत मनोरे रचना तुम्ही मग्न असता.तुमचा स्वभाव भिडस्त आहे .तुम्ही शांत स्वभावाचे असून छान कपड्यांचे शौकीन असतात. तुम्ही दुसऱ्याला आकर्षून घेता. खूप संवेदनाशील असल्यामुळे फारच लवकर दुःखी होतात. कधी कधी उत्साही असतात. परंतु हातातील काम अर्धवट सोडल्यामुळे दुःखी होतात. स्वतंत्र वृत्तीची असून इतरांचे ढवळाढवळ आवडत नाही. तुम्हालाच नेतृत्व मिळाला पाहिजे असा तुमचा हट्ट नसतो. कौटुंबिक जीवनात तुम्हाला त्रास होतो .नातेवाईकांकडूनही अडचणी येतात. जरी चंद्रप्रभावामुळे स्वप्नाळू व ध्येयवादी असला तरी शनी ग्रहाचे चातुर्य व व्यवहारी पण लाभते. लाजाळूपणा असला तरी गंभीर पण असतो. शनी ग्रहामुळे धर्मभोळेपणा, खिन्नता ,निराशावाद या गोष्टी तुमच्यात आढळतात.
फार श्रम करण्यात उत्सुक नसता तरीही आर्थिक स्थिती समाधानकारक असते.
वयाच्या 47 नंतर स्थिरता प्राप्त होते.

शुभ दिवस:सोमवार,मंगळवार, शुक्रवार

शुभ रंग: पांढरा, आणि त्या रंगाच्या सर्व छटा, जांभळा आणि त्या रंगाच्या सर्व छटा

शुभ रत्न:मोती ,हिरे, चंद्र खडा

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वरिष्ठ महिलांकडून मार्गदर्शन मिळेल. घरात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल.
शुभ रंग: लाल
उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
आर्थिक नियोजन योग्य होईल. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता. महिलांनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.
शुभ रंग: गुलाबी
उपाय: लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. नोकरी/व्यवसायात नवीन कल्पना मान्य होतील. भावनिक निर्णय टाळा.
शुभ रंग: हिरवा
उपाय: बुधवारी गरजूंना वही–पेन दान.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते, पण तुमची समजूतदार भूमिका प्रशंसनीय ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ रंग: पांढरा
उपाय: शिवाला दूध अर्पण करा.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
आज आत्मविश्वास वाढेल. महिलांना नेतृत्वाची संधी मिळू शकते. अहंकार टाळल्यास मोठा फायदा.
शुभ रंग: केशरी
उपाय: सूर्यनमस्कार 12 वेळा.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
कामात बारकाईने लक्ष दिल्यास यश. सहकाऱ्यांची मदत मिळेल. मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त.
शुभ रंग: हलका हिरवा
उपाय: दुर्गा सप्तशतीतील एखादा श्लोक वाचा.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
नातेसंबंधात समतोल राखावा लागेल. सौंदर्य, कला, डिझाइनशी संबंधित महिलांसाठी चांगला दिवस.
शुभ रंग: आकाशी
उपाय: शुक्रवारी पांढरे कपडे वापरा.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
निर्णयक्षमतेचा फायदा होईल. जुन्या अडचणींवर तोडगा निघेल. गुप्त शत्रूपासून सावध रहा.
शुभ रंग: मरून
उपाय: हनुमानाला लाल फुल अर्पण.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
शिक्षण, स्पर्धा परीक्षा,नवीन शिकण्यासाठी अनुकूल दिवस. महिलांनी आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरुवारी गूळ–चना दान.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन एकाग्र राहील. कामात यश, वरिष्ठांची दखल. जबाबदारी वाढेल.
शुभ रंग: तपकिरी
उपाय: शनी मंत्र “ॐ शं शनैश्चराय नमः” जप.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
नवीन तंत्रज्ञान, सोशल मीडिया, ऑनलाइन कामातून लाभ. महिलांसाठी नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.
शुभ रंग: निळा
उपाय: गरजूंना काळे तीळ दान

♓ मीन

मैत्रीणींनो आज
भावनांवर नियंत्रण ठेवा. घरात शांतता राखण्यासाठी संयम आवश्यक. सर्जनशील महिलांसाठी चांगला दिवस.
शुभ रंग: जांभळा
उपाय: विष्णू सहस्रनाम वाचन.

RELATED ARTICLES

Most Popular