लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर शनिवार, 17 जानेवारी 2026. पौष कृष्ण चतुर्दशी
राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30
“आज चतुर्दशी वर्ज्य दिवस आहे. आज जन्मलेल्या बाळाची रास धनू
(विष्टि करण, व्याघात योग,शकुनी करण शांती)
आजचे राशिभविष्य आणि
17 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनि या ग्रहाचे वर्चस्व आहे.
तुम्ही उत्कृष्ट संघटक व विचारी असता .तुमचे विचार विधायक व क्रियाशील असतात. शांतता प्रिय असून लोक कल्याणासाठी प्रयत्न करता. गुढ विद्या, हिप्नॉटिझम या गोष्टींचे आकर्षण असते. तुम्ही धाडसी असून गर्विष्ठ असतात. व्यक्तिमत्व प्रभावी असते. बुद्धिमान व हुशार आहात. काही वेळा अतिशय उदार असतात तर काही वेळा अतिशय कंजूषणा दाखवतात. संशोधनाची व ज्ञानाची आवड असते. वर्चस्व गाजवणे आवडते. तुम्ही दृढ निश्चयी, कडक शिस्तीचे ,स्थिर,कर्तव्यतत्पर आहात. शांतता व एकांत प्रिय आहे.तुम्हाला गंभीर रहाणे आवडते. शास्त्रीय संगीत, फुले रम्य देखावे, निसर्ग यांची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला एकांत प्रिय आहे. तुम्ही समतोल विचार करणारे आहात. तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची तुम्हीयोग्य सांगड घालू शकतात. भविष्याची आखणी तुम्ही काळजीपूर्वक करतात. तुम्ही अतिशय कष्टाळू आहात. आणि ध्येयपूर्तीसाठी झपाटलेले असतात. इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. कामात सातत्य असले तरी काही अडचणी आणि कामात विलंब याचा तुम्हाला वारंवार अनुभव येतो.
तुमच्याकडे योग्य तर्हेने व्यवस्था पन करण्यासाठी लागणार दरारा आणि वचक,जोर आहे. आर्थिक नियोजन उत्तम जमते. इतरांच्या समस्या तुम्ही योग्य तर्हेने समजून घेऊ शकतात आणि त्यावर तुम्ही बरोबर सल्ले देतात. तुमच्या कामाचे श्रेय अनेकदा हिरावून घेतले जाते.कार्यक्षम असून अधिकार गाजवणारे आहात. हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असते.गरीब दुबळ्या लोकांच्या विषयी कणव असते. कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असता.कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणाऱ्या ,मुले व नवरा यांच्या महत्वाकांक्षेसाठी त्याग करणाऱ्या आहात. स्त्रीसुलभ प्रेम किंवा मृदुपणा कमीच असतो.सामाजिक संपर्क असल्याने घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते.कोणत्याही रुढीचे बंधन आवडत नाही.चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते. अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येऊ शकतात.जे कल्पक,कार्यक्षम, बुद्धिमान आहेत त्यांच्या शी चटकन मैत्री होते.
शुभ दिवस – बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग – राखाडी.
शुभ अंक – 4, 8, 9.
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज तुमच्यात आत्मविश्वास दिसून येईल. घरकाम, नोकरी व स्वतःची ध्येये यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. आई-मुलींच्या नात्यात संवाद वाढेल.
स्पर्धा परीक्षा, मुलांचे शिक्षण, मुलाखती यासाठी दिवस चांगला.
भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
शुभ रंग: लाल
उपाय: हनुमानजीला शेंदूर अर्पण करा
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आज कुटुंब व आर्थिक विषय महत्त्वाचे राहतील. खर्च वाढू शकतो पण आवश्यकच असेल.
सासर-माहेरच्या विषयात समजूतदार भूमिका घ्यावी लागेल.
गृहिणी महिलांना घरातील सन्मान वाढेल.
शुभ रंग: क्रीम
उपाय: लक्ष्मी मंत्राचा जप करा
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
आज संवाद, बोलणे, लेखन, सोशल मीडिया, शिक्षण या क्षेत्रात महिलांना लाभ होईल.
मैत्रिणींचा सल्ला उपयोगी ठरेल.
लहान प्रवासाचे योग आहेत.
शुभ रंग: हिरवा
उपाय: तुळशीला पाणी घाला
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
मन थोडे अस्थिर राहू शकते. जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतील.
आई, सासू किंवा कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रीकडून मार्गदर्शन मिळेल.
आरोग्याकडे लक्ष द्या – विशेषतः झोप व पाणी.
शुभ रंग: पांढरा
उपाय: चंद्राला दूधमिश्रित पाणी अर्पण करा
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज तुमचा आत्मसन्मान व नेतृत्वगुण पुढे येतील.
ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा घरात निर्णयक्षमतेची प्रशंसा होईल.
स्त्रीसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा दिवस.
शुभ रंग: सोनेरी
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
कामाचा ताण जाणवेल, पण संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल.
घर-नोकरी दोन्हीकडे जबाबदारी पार पाडावी लागेल.
पोट व थकवा याकडे लक्ष द्या.
शुभ रंग: आकाशी
उपाय: दुर्गामातेचे स्मरण करा
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
आज नात्यांत गोडवा वाढेल.
पती-पत्नी, प्रिय व्यक्ती, मैत्रीण यांच्यात समज वाढेल.
फॅशन, सौंदर्य, कला, डिझाईनशी संबंधित महिलांसाठी उत्तम दिवस.
शुभ रंग: गुलाबी,पांढरा
उपाय: देवीला पांढरे फूल अर्पण करा
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आज मानसिक बळ वाढेल.
घरातील गुप्त प्रश्न, जुने वाद मिटवण्याची संधी मिळेल.
स्वतःच्या भावना दडपून न ठेवता योग्य व्यक्तीशी बोला.
शुभ रंग: मरून
उपाय: शिवलिंगावर पाणी अर्पण करा
♐ धनु
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन सक्रिय राहील.
नवीन शिकण्याची, मार्गदर्शन देण्याची संधी मिळेल.
अती विचारामुळे गोंधळ होऊ शकतो, शांत रहा.
शुभ रंग: पिवळा
उपाय: गुरू मंत्राचा जप करा
♑ मकर
मैत्रीणींनो आज
आज अंतर्मुखता वाढेल.
स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज आहे.
अनावश्यक खर्च टाळा व कामावर लक्ष केंद्रित करा.
शुभ रंग: करडा
उपाय: शनी स्तोत्र वाचा
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
मैत्री, सामाजिक क्षेत्र, ग्रुप कामातून लाभ.
अचानक नवी संधी किंवा प्रस्ताव मिळू शकतो.
स्त्री नेतृत्वासाठी चांगला दिवस.
शुभ रंग: निळा
उपाय: गरजू स्त्रीला मदत करा
♓ मीन
मैत्रीणींनो आज
करिअरविषयी स्पष्टता येईल.
वरिष्ठ महिलांचा पाठिंबा मिळेल.
भावनिक निर्णय टाळून व्यावहारिक दृष्टी ठेवा.
शुभ रंग: जांभळा
उपाय: विष्णू सहस्रनाम पठण क