Homeईपेपरआदर्श गाव देऊळवाडी येथील उपोषण अखेर माघार.

आदर्श गाव देऊळवाडी येथील उपोषण अखेर माघार.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/1/2026 एकेकाळी आदर्श गाव म्हणून तालुक्यामध्ये परिचित असलेले देऊळवाडी हे गाव. आज त्याच गावावरती देऊळवाडी गुंडोपंत दापका रस्ता अदृश्य झाले का असे म्हणायची वेळ आली. देऊळवाडी येथील प्रकाश मधुकरराव केंद्रे पाटील हे 25 डिसेंबर 2025 पासून मोजे देऊळवाडी येथे पहिल्यांदाच देऊळवाडी ते गुंडोपंत दापका रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले त्यामुळे ती परिस्थिती त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता उपोषणाचा मार्ग अवलंबला. दहा दिवस उपोषण चालू असून त्या उपोषणास कुठलाही कार्यकर्ता अथवा नेता या उपोषणाकडे ढुंकूनही पहिला नाही. उलट त्या उपोषणकर्त्यास व तेथील कार्यकर्त्यास कार्यालयाकडून उलट तुमच्यावर कारवाई करू अशा धमक्या येत होत्या असे गाववाल्यांच्या म्हणण्यातूनतेथे नजरेत आले. परवाच उदगीर नगरपालिका निवडणूक लढवलेले बंजारा समाजाचे कार्यकर्ते संजय राठोड यांनी त्या उपोषणास वेळोवेळी भेट देऊन तेथील परिस्थितीची सर्व सत्यता जाणून घेऊन शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांना संपर्क साधून देऊळवाडी ते गुंडोपंत दापका या रस्त्याच्या बाबतीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला असून काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. व त्या उपोषणकर्त्यास कोणीही राजकीय अथवा सामाजिक नेता भेटला नाही असे संजय राठोड यांनी सुधाकर भालेराव यांना वृत्तांत देऊन उपोषण स्थळी येण्यास भाग पाडले. सुधाकरराव भालेराव यांनी अधीक्षक अभियंता बाळासाहेब थोरात यांना फोनवरून सर्व हकीकत सांगून तेथील परिस्थिती जाणून घेऊन तेथे हजर राहावे असे फोन द्वारे कळवले. अधीक्षक अभियंता उप अभियंता शाखा अभियंता मोजे देऊळवाडी येथे हजर राहून माजी आमदार सुधाकरराव भालेराव व गावकऱ्यांच्या समक्ष रस्त्याची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्याची चौकशी समिती नेमून त्याचे चौकशी करून कारवाई करू असे लेखी आश्वासन उपोषण कर्त्यास देऊन माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यास विनंती केली. सुधाकरराव भालेराव यांच्या विनंती मान देऊन उपोषण करता प्रकाश मधुकरराव केंद्रे पाटील यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण अखेर माघार घेतले. उपोषण करता हा मी कुठल्या आमिषाला अथवा मोहाला बळी न पडता गावाच्या भल्यासाठी मी हे उपोषण केले. सुधाकरराव भालेराव यांनी वाढवणा पोलीस स्टेशन पीआय यांना फोन द्वारे संपर्क साधून तेथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी पाठवावे अशा सूचना केल्या तेथे पोलीस कर्मचारी हजर राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत केली शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व समस्त गावकरी मंडळी हजर होती.

.

RELATED ARTICLES

Most Popular