Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

शनिवार, 20 डिसेंम्बर 2025.

मार्गशीर्ष अमावास्या

राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30

“आज अमावस्या वर्ज्य दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची रास धनू (गंड योग,मूळ नक्षत्र, नाग/किंस्तुघन करण शांती)

20 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

     तुमच्यावर चंद्र आणि गुरू ग्रहाचा प्रभाव आहे.

तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या प्रगल्भ संकल्पना शक्ती असते मान मरातब आणि प्रतिष्ठा यांची आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे तुम्ही कृती करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे स्वतंत्र विचार नाही परंतु दुसऱ्याचे विचार व कल्पना तुम्ही प्रत्यक्ष आणण्याचे कर्तुत्व तुमच्याकडे आहे .तुमच्या सहकारी वृत्ती असून दुसऱ्याचे विचार व भावना यांची कदर करतात चांगले वाईट तुम्ही सहजपणे समजू शकता .स्वप्नाळू स्वभाव असतो. कामात व्यवस्थितपणा टापटीप आढळून येते. आळशीपणा असतो. कल्पना व महत्त्वकांक्षा यांचा संगम झाल्यामुळे मोठमोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला रस असतो. गुरु ग्रहामुळे तत्वज्ञान व स्थिर वृत्ती प्राप्त होत असली तरी चंद्रामुळे अस्वस्थता व चंचलतेचा प्रत्यय येतो .तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. दुसऱ्याला आकर्षण घेण्याची एक संमोहन शक्ती तुमच्याकडे आहे. कौटुंबिक जीवनात उतार चढाव होतो. धर्माबद्दल तुम्हाला ओढ असते पण कर्मकांडावर विश्वास नसतो .निसर्गाबद्दल प्रेम असून समुद्र तारे यांच्या बद्दल आकर्षण असते. तुमचा उत्कर्ष 29 वर्षानंतर होतो. दुसऱ्याला मदत करणे आणि यात तुम्हाला आनंद होतो महत्त्वकांक्षी योजना मुळे आर्थिक स्थितीत चढ-उतार होत असतो .वयाच्या 38 वर्षापासून आर्थिक स्थिती समाधानकारक बदल होतो. अस्वस्थ स्वभावामुळे विनाकारण खर्च होतो .तुम्ही अतिशय प्रेमळ आपुलकीने वागणाऱ्या व निष्ठावान आहात. तुमच्यात लहरीपणा असतो. प्रतिष्ठेला जपतात .दिमाख व वैभवशाली जीवनाकडे तुमचा असतो. बागबगीच्या व पाळीव जनावरांची आवड असते. घरात आनंद व शांतता ठेवण्यात कडे तुमचा कल असतो .आपल्या पतीला सर्व प्रकारे साथ देण्यात तुम्ही वाकबगार असता. उत्तम सह धर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता. ज्यांच्याकडे मान मरातब ,प्रतिष्ठा ,अधिकार व महत्त्वकांक्षा आहे अशा मित्र-मैत्रिणींशी चांगले जुळते.

शुभ दिवस- सोमवार,गुरुवार, शुक्रवार

शुभ अंक – २,६,९

शुभ रंग – पांढरा, बदामी,जांभळा

शुभ रत्न:-मोती,हिरा, पुष्कराज,चंद्र मणी

आजचे राशिभविष्य

♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज तुमच्यात प्रचंड ऊर्जा असेल, पण ती योग्य दिशेने वापरणे गरजेचे आहे. घरातील एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास राग येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद टाळा. महिलांनी आज संयम बाळगणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, आम्लपित्त जाणवू शकते.

♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आज आर्थिक बाबतीत संभ्रम निर्माण होईल. कुणावरही पूर्ण विश्वास ठेवून व्यवहार करू नका. कुटुंबातील स्त्रियांनी जबाबदाऱ्या शांतपणे पार पाडाव्यात. भावनिक नात्यांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका.

♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
आज मन चंचल राहील. अनेक विचार एकाच वेळी डोक्यात फिरतील. कामात लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. पती/सहकारी यांच्याशी बोलताना शब्द सांभाळून वापरा. स्त्रियांनी आज कुठलाही वाद टाळलेला बरा.

♋ कर्क
मैत्रीणींनो आज
घर, कुटुंब, मुलं यांच्यासाठी धावपळ वाढेल. जुन्या आठवणींमुळे मन थोडे उदास होऊ शकते. स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, पाय दुखणे जाणवू शकते.

♌ सिंह
मैत्रीणींनो आज
रवी-चंद्र युतीमुळे आत्मविश्वास वाढेल. आज महिलांना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. मात्र “मीच बरोबर” हा हट्ट टाळा. घरात किंवा ऑफिसमध्ये नेतृत्व कराल, पण नम्रता ठेवल्यास यश निश्चित.

♍ कन्या
मैत्रीणींनो आज
आज अतिविचारामुळे तणाव वाढू शकतो. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधण्याची सवय त्रासदायक ठरेल. महिलांनी स्वतःवर जास्त दबाव टाकू नये. घरातील कामे नियोजनाने केली तर दिवस सुलभ जाईल.

♎ तुला
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधांमध्ये समतोल साधणे कठीण जाईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. सौंदर्य, कपडे किंवा घरासाठी खर्च होऊ शकतो. भावनिक निर्णय टाळा. आज स्वतःच्या मनःशांतीसाठी काहीतरी आवडते करा.

♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
चंद्र–मंगळ युतीमुळे चिडचिड, राग वाढेल. लहान गोष्टींवरून मोठे वाद होऊ शकतात. महिलांनी वाहन चालवताना किंवा धारदार वस्तू वापरताना सावध राहावे. संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल.

♐ धनु
मैत्रीणींनो आज
आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन अतिशय उत्साही राहील. नवीन कल्पना, योजना सुचतील. पण त्या लगेच अंमलात आणू नका. महिलांनी आज स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे. प्रवासाचा योग संभवतो.

♑ मकर
मैत्रीणींनो आज
आज मनन कराल . एकटेपणा जाणवू शकतो. काही गोष्टी मनात साठून राहतील. देवपूजा, मंत्रजप, ध्यान यामुळे मनाला शांती मिळेल. झोप पूर्ण घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
मित्रमैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी गैरसमज संभवतात. अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. समाजकार्य, लेखन किंवा सर्जनशील कामात मन गुंतवा, मन हलके होईल.

♓ मीन
मैत्रीणींनो आज
नेपच्यून प्रभावामुळे भ्रम, संभ्रम जास्त राहील. कुणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. महिलांनी आज स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकावा, पण व्यवहारिक निर्णय घ्यावेत. पाणी पिणे आणि विश्रांती आवश्यक.

RELATED ARTICLES

Most Popular