लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वऱ
रविवार, 2नोव्हेंबर 2025*. कार्तिक शुक्ल एकादशी/द्वादशी
राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज क्षय तिथी,भागवत एकादशी,तुलसी विवाह आरंभ, चातुर्मास समाप्ती, पंढरपूर यात्रा
आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ/सकाळी 11:27 नंतर मीन.(विष्टी करण, व्यघात योग शांती)
2 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चन्द्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
मान व प्रतिष्ठा यांची आवड असते.दुसऱ्यांचे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तृत्व तुमच्याकडे असते.चांगल्या वाईट मधला फरक तुम्ही जाणता. ध्येय पूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही.विचार न करता उतावीळ पणे नवीन कामात घुसण्याची वृत्ती असते.तुमची चुक तुमच्या लक्ष्यात आली तरी ती मान्य करायला तयार होत नाही.खोटा अभिमान व मानी पणा तुमच्यात असतो.दीन दुबळ्या बद्दल दया व आदर असतो.तुमचे विचार धैर्याने व ठाम पणे मांडता.कायद्याचे पालन करायला आवडते. दूरच्या प्रवासाची आवड असते.कल्पना ,उत्साह असल्याने मोठमोठ्या योजना पार पाडण्यात आनंद वाटतो.उत्कर्ष 29 वयानंतर होतो.कौटुंबिक जीवनात उतार चढाव होतो. तुम्हाला स्वतःच्या दिसण्याच्या व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो .तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असतात . घराची सजावट उत्तम असावी असे वाटते. दिमाख व वैभवशाली जीवनाकडे ओढ असते. बागबगीच्या व जनावरांची आवड असते. तुमच्याकडे लहरीपणा असतो. प्रतिष्ठेला जपता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते.
शुभ रंग:- किरमिजी,पांढरा, निळा
शुभ दिवस:- शुक्रवार, सोमवार मंगळवार
शुभ रत्ने:- मोती आणि पोवळे, हिरा.
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज लाभ स्थान आणि व्यय स्थानात चन्द्र आहे.महत्वाची कामे सकाळीच उरका.कामाला वेग येईल.आरोग्य सुधारेल.
वृषभ:- मैत्रिणींनो आज घरगुती वातावरण आनंदी राहील.जुन्या समस्येवर उपाय मिळेल.भावनिक ताण राहील.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.प्रवासातून लाभ होतील.
मिथुन:- मैत्रिणींनो आज संवाद कौशल्य आणि विचार शक्ती वाढेल.नवीन कल्पनांना वाव मिळेल.प्रवास कार्यसाधक होतील. परस्पर संवादातून फायदा होईल.वडिलांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
कर्क:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. खर्च वाढणार आहेत. मात्र तरीही आनंदी राहाल. मौल्यवान क्षण अनुभवाल. घरातील वातावरण शांत ठेवा.सर्जनशीलवृत्ती वाढेल.दूरचे प्रवास घडतील.
सिंह:- मैत्रिणींनो आज सकाळ चे सत्र अनुकूल आहे.आर्थिक लाभ होतील.वरीष्ठ सहकार्य करतील.दुपारनंतर भावनिक शांतता अनुभवाल. देवदर्शनासाठी उत्तम काळ.
कन्या:- मैत्रिणींनो आज चर्चेतून लाभ होतील. शिक्षण, सल्लागार, लेखन क्षेत्रात यश.सबुरीने घ्या.आरोग्य संभाळा.
तुळ:-मैत्रिणींनो आज आवडत्या व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल.कल्पकतेला वाव मिळेल.नात्यात गोडवा येईल.कलाकारांना उत्तम संधी चालून येतील. दागिने, मनोरंजन इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.आरोग्य जपा.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज घरात वातावरण सुखद राहील.शनी चन्द्र युती मुळें जुन्या समस्या डोके वर काढतील पण गुरू त्रिकोणामुळे त्यावर मार्ग ही निघेल. आत्मविश्वासाने पुढे चला.
धनु:-मैत्रिणींनो आज प्रेरणादायी दिवस. लेखन,आध्यत्मिक कार्यासाठी चांगला.सर्व कार्यात यश मिळेल.नवीन काही शिकण्याची संधी येईल.
मकर:- मैत्रिणींनो आज कौटुंबिक आणि व्यवसायिक जबाबदारी मध्ये समतोल राखा. संयम ठेवा.आरोग्य सुधारेल.
कुंभ:- मैत्रिणींनो चन्द्र आज तुमच्याच राशीत आणि द्वितीयात आहे.तेजस्वी दिवस.सकाळच्या सत्रात अनपेक्षित लाभाची शक्यता.मन प्रसन्न राहील.इतरांवर प्रभाव राहील.नवीन संधी येतील.मैत्र मंडळी मदत करतील.प्रवासात सावध रहा.रागावर नियंत्रण ठेवा.संध्याकाळी मन भावनाशील होईल.वाहन सौख्य लाभेल.
मीन:- मैत्रिणींनो आज सकाळ जरी संथ असली तरी दुपारनंतर कामाला वेग येईल.नवीन कामाला सुरुवात अत्यंत शुभ होईल.लक्ष्मी प्राप्तीचे योग. प्रवासाचे योग.