Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

शनिवार, 1नोव्हेंबर 2025*. कार्तिक शुक्ल दशमी/एकादशी

राहू काळ – सकाळी 9 ते 10:30

आज चांगला दिवस.प्रबोधिनी एकादशी,स्मार्त एकादशी
आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ.

1 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या स्वभाव महत्त्वकांक्षी असून आणि गोष्टी तुम्ही रस घेता .तुम्ही स्वतंत्र विचारांचे वृत्तीचे असतात .सतत बदल करण्याकडे ओढ असते. कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाही .जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे वाटते. त्यामुळे बरेच चढ-उतार होतात. उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते. संभाषण चातुर्य असल्याने दुसऱ्यावर चटकन छाप पडते .कलेविषयी आकर्षण असून उत्साहाने भाग घेतात .इच्छाशक्ती दांडगी असते. व्यावहारिक जीवनावर बरोबरच गुढ विषयांचे सुद्धा आकर्षण असते .मानवी स्वभाव ओळखण्याचे ज्ञान उपजत असते .तुम्ही सभ्य, निस्वार्थी विशाल दृष्टिकोनाचे असता. तुम्ही आपले विचार दुसऱ्या वर लादता. जीवनातील रूढी,बंधने तोडण्याचे सतत प्रयत्न करतात. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो. विरोध करण्याच्या स्वभावामुळे गुप्त शत्रू तयार करतात. तुमच्या स्वभाव तापट व धाडसी आहे. दुसऱ्यावर दया करण्यात सुप्त आनंद होतो.जीवन विषयक सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतात .पैशाच्या बाबतीत अनेक चढ-उतार होतात असं होतं .उत्तम व्यक्तिमत्त्वामुळे तरांवर छाप टाकून व्यवसायात चांगला तर्‍हेने पैसा मिळतो. पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. तुम्ही महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात .स्वतःचा नोकरी उद्योग करून उत्पन्नात भर घालतात .विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते .मैत्रीपूर्ण जीवनामुळे तुमचे घर म्हणजे एक सामाजिक केंद्रच असते. तुम्हाला अनेक गोष्टी त रस असतो .जीवन साथीदाराची निवड करताना आपल्यासारखाच उत्साही सौंदर्य प्रेमी ,उत्तम कपड्यांचे आवड असलेला घरात समाजात मिसळणारा असा निवडावा.

शुभ रंग:- सोनेरी पिवळा नारंगी किंवा जांभळा

शुभ दिवस:- रविवार सोमवार गुरुवार

शुभ रत्ने:- माणिक आणि पाचू.
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे.मन आनंदी राहील.मानसन्मान मिळेल.मैत्रिणींच्या सल्ल्याने लाभ होतील.पतीचे प्रोत्साहन मिळेल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज कामाचा तणाव राहील.प्रवास घडेल.आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.

मिथुन:- मैत्रिणींनो आज अचानक प्रवासाचे योग.करीयर मध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी चांगला काळ.नोकरीत बदल करण्यासाठी चांगला काळ.

कर्क:-मैत्रिणींनो आज कौटुंबिक आघाडीवर व्यग्र रहाल.पती पत्नी मध्ये संवाद आवश्यक.भावनिक गोंधळ होऊ शकतो.संध्याकाळ आनंदी.

सिंह:- मैत्रिणींनो आज सामजिक वर्तुळात मानसन्मान मिळेल.प्रसिद्धी लाभेल.कामात वरिष्ठ सहकार्य करतील.

कन्या:- मैत्रिणींनो आज नातेसंबंध दृढ होतील.विवाहाचे प्रस्ताव येतील.नशिबाची साथ मिळेल.विद्यार्थी नीना यशदायक काळ.

तुळ:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे.तुमच्याच राशीत रवी आहे.मन आनंदी राहील. कामातले अडथळे दूर होतील. आर्थिक लाभ वाढेल. आत्मविश्वास वाढेल.तेज वाढेल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज कामाचा थकवा जाणवेल.जुने वाद मिटतील.अध्यात्मिक कल राहील.

धनु:-मैत्रिणींनो आज उत्तम दिवस आहे.उत्साह वाढेल.सामूहिक कामात यश.नवीन ओळखी होतील.

मकर:- मैत्रिणींनो आज महत्वाची कामे होतील.घरात आनंदी घटना घडतील.पतीकडून कौतुक होईल.आर्थिक लाभाचे योग.

कुंभ:- मैत्रिणींनो आज अनुकूल दिवस आहे.चंद्र तुमच्याच राशीत आहे.नावलौकिक,आत्मविश्वास वाढेल.काहींना विशेष मानसन्मान मिळेल. नवीन संधीची दालने उघडतील.

मीन:- मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.आरोग्याच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका.वाहन काळजीपूर्वक चालवा.रुटीन चालु ठेवा.अंतत्स्फूर्ती ने निर्णय घ्या.गुप्त शत्रूंपासून सावध रह

RELATED ARTICLES

Most Popular