Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

शनिवार, *25 *ऑक्टोबर 2025*. अश्विन कृष्ण नवमी

राहू काळ – सकाळी 9 ते 10:30 .

आज जेष्ठा वर्ज दिवस.विनायकी चतुर्थी
आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक(विष्टि करण शांती)

25 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. कोणत्याही एका विषयात फार काळ तुम्ही रमत नाही .हरहुन्नरी व्यक्तिमत्व असते. प्रवासाची आवड असून परदेशाशी संबंध येतात .तुम्ही प्रामाणिक विश्वासू व निष्ठावान आहात .चंद्र नेपच्यून या ग्रहांच्या प्रभावामुळे स्वभाव अति चंचल आहे, त्यामुळे काही वेळा विसंगत स्वभावाचे दर्शन होते. तुमची स्मरणशक्ती चांगली असते. स्वतःच्या प्रेमसंबंधाबाबत तुम्ही निराशा असतात. स्वतःच्या विचारात कृतीत स्वतंत्र वृत्ती असून कोणाचीही ढवळाढवळ खपत नाही .भावनांवर ताबा ठेवण्याचे कसब तुमच्यात असते. स्वतःचे गुण दाखवण्याची तुम्हाला संधी मिळावी लागते. भाषण, लेखन, रेडिओवर श्रुतिका यात यश मिळते. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.

शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:- मैत्रिणींनो आज अध्यात्मिक लाभ होतील. अष्टमात चन्द्र आहे.इतरांच्या प्रभावाखाली येऊन नुकसान होऊ शकते.जोडीदाराच्या मार्फत लाभ होईल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज प्रेमात यश.महिलांशी संबंधित व्यवसायात लाभ होईल.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते.

मिथुन:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभाचा.महिला सहकारी मदत करतील.कर्जाची व्यवस्था होईल.

कर्क:-मैत्रिणींनो आज मुलांकडुन चांगली बातमी।मिळेल.प्रेमविवाहात यश.संगीत,नृत्य आदी कलांचा आनंद घ्याल.अकल्पित धनप्राप्ती चे योग.शिक्षण घेताना अडथळे येऊ शकतात.

सिंह:- मैत्रिणींनो आज वाहन,वास्तू सौख्याचा दिवस.आराम करण्याचा मूड राहील.घरात सजावटीसाठी खर्च कराल.

कन्या:- मैत्रिणींनो आज भावंडाशी संवाद घडेल.कलात्मक दृष्टी कोन राहील.संगीत,लेखन,प्रवास यात आनंद घ्याल.छोट्या सहली होतील.मस्त मॉल वैगरे ठिकाणी भेट द्याल.

तुळ:-मैत्रिणींनो आज कौटुंबिक भेटीगाठी होतील.गायन आदी कलाकारांसाठी उत्तम दिवस.तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.मौजमजेचा दिवस.मौल्यवान खरेदी होऊ शकते. स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढाल.प्रेमीकाना यश.

धनु:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील.विदेशी यात्रा ठरतील.अध्यात्मिक रुची वाढेल.एकांत प्रियता राहील.

मकर:- मैत्रिणींनो तुमची जोडीदारासोबत खरेदी होईल.मन प्रसन्न राहील.मैत्र परिवारासोबत चैन कराल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज तुमच्या व्यक्तीमत्वचा इतरांवर प्रभाव राहील.संगीत,ललीतलेखन,चित्रकला वैगेरे क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.सार्वजनिक जीवनात यशस्वी व्हाल.

मीन:- मैत्रिणींनो आज वैवाहिक जीवन शांत आणि प्रेमपूर्ण असेल.उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाऊ इच्छुकांना यश.सरकारी कामात यश.कला, फॅशन डिझायनर इत्यादी काम करणार्यांना नवीन संधी चालून येती

RELATED ARTICLES

Most Popular