लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
कार्तिक शुक्ल तृतीया
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
“आज शुभ दिवस.सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश,वाहन बेडूक
आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक.
आजचे राशिभविष्य
आणि 24 ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्या महिलांची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा:-💐
तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्या भरपूर ओळखी असतात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि त्यानंतर भाग्योदय होतो. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात. स्वतःकडे उत्तम गुण असतात मात्र ते दाखवण्याची संधी मिळणे महत्वाचे असते. बुद्धिमत्ता आणि समरणशक्ती उत्तम असते. इतरांना न दुखावण्याचा स्वभाव असतो. तुम्ही स्वतः कलाकार असून कलाप्रिय आहात. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती, अंतर्गत आवाजाची देणगी आणि व्यवहारिकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, मोहक आणि आकर्षक आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना समाजापेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे उद्दिष्ट काय आहे यावर लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला मानसन्मान मिळतो. विविध समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. मित्रांना मदत करण्यात तुम्हाला सात्विक आनंद मिळतो. धर्म आणि तत्वज्ञान या विषयांची आवड असते. तुमचे आयुष्य आरामदायक आणि सुखलोलूप असते. तुम्ही उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने वापरतात. स्वतःच्या प्रेमासंबंधींबाबत तुम्ही संशयी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पावले टाकतात. तुमच्यात अहंगंड असून कधीकधी तुम्ही स्वतःची मते इतरांवर लादतात.अनपेक्षितपणे पैसा मिळतो.पण बचत करण्याची प्रवृत्ती नसते. खर्चिक वृत्ती असते.तुमचे आयुष्य आरामदायक व सुखलोलुप असते.उच्च प्रतीचे कपडे व दागिने वापरता.समाज प्रिय असल्याने सतत पाहुण्यांचा ओघ घरी चालू असतो.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाचु, मोती, हिरा.
आजचे राशिभविष्य
मेष:मैत्रिणींनो आज खर्चिक दिवस.मन अस्वस्थ राहील.वाहन जपून चालवा.कामे रेंनगाळतील.
वृषभ:-मैत्रिणींनो आज अचानक उदभवणार्या खर्चाने चिंतेत रहाल.पण त्याचे नियोजन होईल.नात्यात संवाद आवश्यक आहे.
मिथुन:- मैत्रिणींनो आज गोड बोलून कामे करून घ्याल.कामात थोडी गोंधळाची स्थिती राहील.आरोग्याची काळजी घ्या.विशेषतः त्वचा, संसर्गजन्य रोगाची
कर्क:मैत्रिणींनो आज भावना आणि बुद्धीचा समतोल आवश्यक आहे.संततीचे हट्ट पुरवावे लागतील.मैत्र परिवाराचा आधार मिळेल.संध्याकाळी घरात शांत वातावरण ठेवा.
सिंह:- मैत्रिणींनो आज भौतिक सुख लाभेल.वाहन,गृह सौख्य लाभेल.कामात सफलता मिळेल.स्पर्धा परीक्षेत यश.बढती मिळू शकते.
कन्या:-मैत्रिणींनो आज सोशल मीडियावर टिप्पणी चा लाभ होईल.पत्र,इमेल द्वारा खूष खबर मिळेल.छोटे प्रवास घडतील.
तुळ:-मैत्रिणींनो आज नोकरी व्यवसायात उत्तम लाभ मिळेल.मानसन्मान मिळेल.वाहन ,वास्तू खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.कामकाजात यश.आर्थिक दृष्टीने उत्तम.नवीन संधी चालून येतील.
धनु:-मैत्रिणींनो आज रुटीन चालू ठेवा.आरोग्यासाठी खर्च होईल.वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर:-मैत्रिणींनो आज कौटुंबिक सौख्याचा दिवस.पतीकडून लाभ होतील,खरेदी कराल.मैत्र मंडळींसाठी खर्च कराल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज नवीन काही कामाच्या संधी उपलब्ध होतील.कामानिमित्त प्रवास घडेल.त्यातून लाभ होईल.
मीन:-मैत्रिणींनो आज उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याऱ्याना सुसंधी मिळेल.धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.भावनांवर नियंत्रण ठेवा. मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद घ्याल.