Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर ार

गुरूवार, 23ऑक्टोबर 2025*. कार्तिक शुक्ल द्वितीया

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

” आज आनंदी दिवस”
आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ/रात्री 10:06 नंतर वृश्चिक

23 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही महत्त्वकांक्षी असतात. कायद्याचे पालन करायला आवडते. शांतता प्रिय असतात. परंतु भोवती भोगवादी लोकांचे जाळे असते . तुम्हाला व्यावहारिक व आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टीची जोड मिळते. संगीत ,वाङ्मय मय प्रवासाची आवड असते. पाण्याजवळ तुमच्या भाग्योदय होतो .वरिष्ठ लोकांकडून मदत संरक्षण मिळते. विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही लोकप्रिय असता. तुमच्याकडे चांगली शब्द संपत्ती असल्यामुळे बोलण्यात, लिखाणात, भाषण देण्यात, शिकवण्यात यश मिळते. मोठेपणा,प्रतिष्ठा, मान या गोष्टीला अधिक महत्त्व देता. दुसऱ्याची परीक्षा झटकन करण्याचे ज्ञान तुमच्याकडे उपजतच असते .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य वापरण्याची आवड असते. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमतात. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असतात. पतीशी जुळवून घेण्याबाबत हुशार असता. आरोग्याने सुदृढ असतात चाकोरी बद्ध आयुष्य तुम्हाला आवडत नाही, तरीही तुम्ही स्वभावाने नम्र असता.पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरात टापटीप व्यवस्थितपणा असतो ,पण ही कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात तुम्ही पटाईत असतात. बुधाचा प्रभाव असल्यामुळे व्यापारी वृत्ती असे पैशाला जास्त महत्त्व दिले जाते. आर्थिक स्थैर्य मिळवण्याची महत्त्वकांक्षा असते.केलेल्या कष्टाचे चीज होते. वयाच्या 23 वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत पैशाच्या दृष्टीने चढती कमान असते कमान असते. शेअर्स व गुंतवणुकीमुळे तुम्हाला यश मिळते .परंतु उदार वृत्तीमुळे इतर लोक तुमचा गैरफायदा घेतात.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.

शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

♈ मेष
मैत्रिणींनो आज
भावंडांशी प्रेम व आत्मीयता वाढेल. आज भाऊबीजेचा उत्सव आनंदात साजरा होईल. नवीन दागिने किंवा साडी खरेदीचा योग. वडिलांकडून कौतुकाचे शब्द मिळतील.

♉ वृषभ
मैत्रिणींनो आज
घरात मंगल वातावरण. भाऊसोबतचे संबंध घट्ट होतील. थोडी थकवा जाणवेल, पण मन आनंदी राहील. घरात पाहुणचार वाढेल. नोकरीत प्रगतीची चिन्हे.

♊ मिथुन
मैत्रिणींनो आज
आर्थिक स्थिती सुधारेल. भाऊबहीणींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. नोकरीत वरिष्ठांकडून पाठबळ. आज घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

♋ कर्क
मैत्रिणींनो आज
भावनिक दृष्ट्या समृद्ध दिवस. घरात आनंद आणि ऐक्य. मातेकडून शुभाशीर्वाद. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कामात रस वाढेल.

♌ सिंह
मैत्रिणींनो आज
आजचा दिवस प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळ्याने भरलेला. कामात आत्मविश्वास वाढेल. भाऊबहीणीकडून सुंदर भेटवस्तू. स्तुती मिळेल.

♍ कन्या
मैत्रिणींनो आज
काही लहान गैरसमज मिटतील. मित्रमैत्रिणींकडून शुभवार्ता. आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम. सणासुदीच्या खर्चात मर्यादा ठेवा.

♎ तूळ
मैत्रिणींनो आज
नवीन कपडे व दागिन्यांचा योग. सौंदर्य आणि आकर्षणात भर. भावंडांकडून प्रेम मिळेल. वैवाहिक जीवन गोड राहील. प्रवासाचे नियोजन होऊ शकते.नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट ची खरेदी होईल.लक्ष्मी प्राप्तीचे योग.

♏ वृश्चिक

मैत्रिणींनो आज
आत्मविश्वास व उत्साह वाढेल. भाऊबीजेमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य चांगले. नवे काम हाती घ्यायचा शुभ दिवस.

♐ धनु

मैत्रिणींनो आज मन थोडे अस्थिर राहील. पण सणाच्या वातावरणामुळे आनंद टिकेल. नोकरीत अडथळे दूर होतील. मित्रपरिवाराकडून भेटवस्तू मिळतील.

♑ मकर

मैत्रिणींनो आज कुटुंबात स्नेह वाढेल. भाऊबहीणीकडून आधार. आर्थिक लाभाचे योग. सणाच्या खर्चात संयम ठेवा. आरोग्य उत्तम.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज सर्व कामात यश मिळेल. भाऊबहीणींसोबत स्नेहभोजनाचा आनंद. सणाच्या निमित्ताने प्रवासाचा योग. नव्या संधी निर्माण होतील.

♓ मीन

मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. भाऊबहीणींकडून भेटवस्तू. कौटुंबिक सुसंवाद वाढेल. मनात समाधान. शुभ वस्त्र धारण कर

RELATED ARTICLES

Most Popular