लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
शुक्रवार, 17ऑक्टोबर 2025*. अश्विन कृष्ण एकादशी
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12
आज चांगला दिवस.रमा एकादशी,वसुबारस
आज जन्मलेल्या बाळाची रास सिंह आहे.सूर्याचा तुळ राशीत प्रवेश.
17 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत.तुम्ही उत्तम संघटक व विचारी आहात. तुमचे ध्येय व महत्वाकांक्षा उच्च असतात. आणि विचार क्रियाशील व विधायक असतात.शांतताप्रिय असून लोककल्याणकारी कामे करता.गूढ विद्या व हिप्नॉटिझम या विषयी आकर्षण असते.तुमचं व्यक्ती मत्व प्रभावी असून धाडसी व स्वाभिमानी असता.संशोधन ,ज्ञान या कडे ओढ असते.स्वतःच्या कल्पना राबवून विचारातून यश मिळते.
शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो .खास करून कोणत्याही रूढीला बांधून घेणे तुम्हाला पसंत नसते. समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष ♈
मैत्रिणींनो, आज कामात थोडा विलंब जाणवेल. अधिकारी वर्गाकडून गैरसमज होऊ शकतात. शांती आणि संयम ठेवा. दानधर्मात रुची वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ ♉मैत्रीणींनो
आज घराच्या सजावटीत, कपडे किंवा सौंदर्यविषयक खरेदीत वेळ जाईल. मन प्रसन्न राहील. जुनी वस्तू किंवा दागिने दुरुस्त करण्याचा विचार होईल.
मिथुन ♊मैत्रीणींनो
लेखिका, शिक्षिका आणि विद्यार्थिनींसाठी उत्कृष्ट दिवस! नवीन कल्पना आणि संधी मिळतील. संततीकडून शुभवार्ता मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कर्क ♋मैत्रीणींनो
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे बेत ठरतील. कामातील अडथळे दूर होतील पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.
सिंह ♌मैत्रीणींनो
भाग्य उजळेल! आर्थिक लाभ संभवतो. पती-पत्नीमध्ये सौहार्द राखा. महत्त्वाचे निर्णय घेताना आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या ♍मैत्रीणींनो
थोडा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्य किंवा दानासाठी खर्च होऊ शकतो. संयम ठेवा, दिवस मध्यम आहे.
तुळ ♎मैत्रीणींनो
उन्नती आणि सन्मानाचा दिवस! आरोग्य सुधारेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नवे संबंध लाभदायक ठरतील.
वृश्चिक ♏मैत्रीणींनो
मित्रमैत्रिणींकडून अनपेक्षित मदत मिळेल. मात्र आरोग्य थोडं ढासळू शकतं. औषधोपचाराकडे दुर्लक्ष करू नका.
धनु ♐मैत्रीणींनो
दूरच्या प्रवासाचे संकेत आहेत. शिक्षण आणि करिअरमध्ये एकाग्रता साधा. वरिष्ठांशी मतभेद टाळा. मनात उत्साह राहील.
मकर ♑मैत्रीणींनो
कुटुंबातील तणावामुळे मन अस्वस्थ राहील. संततीची चिंता संभवते. कामात कनिष्ठांचे सहकार्य कमी मिळेल. धैर्य ठेवा.
कुंभ ♒मैत्रीणींनो
भागीदारी व्यवसायात लाभ होतील. पतीसोबत आनंदी वेळ घालवाल. आहार-विहाराकडे लक्ष द्या. संततीबद्दल अभिमान वाटेल.
मीन ♓ मैत्रीणींनो
वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. घरगुती वस्तूंची नवीन खरेदी संभवते. आरोग्य जपा, कौटुंबिक वातावरण सौम्य ठेव