Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर महिलांसाठी ज्योतिष – सौ मधुरा पंचाक्षरी,नाशिक.
मोबाइल 9272311600

गुरूवार, 9ऑक्टोबर 2025*. अश्विन कृष्ण तृतीया

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज दुपारी 1 वा पर्यंत चांगला दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास मेष.

9 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे, तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची खोडी काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतात. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असते. तुम्ही तापट असला तरी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःवर ताबा ठेवू शकतात. तुमचे विचार तुम्ही ठामपणे मांडतात आणि तुमच्या मध्ये धैर्य असते. तुम्हाला प्राणी प्रिय असतात आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुमची मानसिक शक्ती अफाट आहे. प्रवासामुळे तुमचा दृष्टिकोन विशाल होतो. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. तुमचे विचार काळाच्या पुढे असतात. त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. तुमच्या आवडी निवडी बाबत तुम्ही अत्यंत ठाम असतात. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे.महत्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होऊ शकता. पतीला त्याच्या व्यवसायात मदत करता. सोबत स्वतः ही व्यवसाय करून उत्पन्नात भर घालता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामजिक जीवनात यशस्वी होता. अभ्यासू वृत्ती व विचारवंत मैत्रिणींशी तुमचे चांगले जुळते. 

शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज स्वतःसाठी खरेदी कराल.मन आनंदी राहील.प्रवास सुखदायक होतील. शैक्षणिक यश लाभेल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज धनप्राप्ती चांगली राहील.कर्ज फिटेल.पदोन्नती चे योग.

मिथुन:- मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.मैत्र मंडळी कडून लाभ होतील.मानसन्मान मिळेल.विवाहाचे योग आहेत.ऐहिक सुख लाभेल.

कर्क:-मैत्रिणींनो आज भरभराट होईल.भेटवस्तू मिळेल.रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.महिला सहकारी मदत करतील.ज्वेलरी,वस्त्र विक्रेत्यांना लाभ होईल.

सिंह:- मैत्रिणींनो आज नवीन वस्त्र ,सुगंधी अत्तर वैगेरे खरेदी होईल.सार्वजनिक ठिकाणी सहभाग नोंदवाल. महत्वाकांक्षा वाढेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज वारसाहक्काने लाभ होतील.चैन कराल. मेहनत वाया जाऊ शकते.

तुळ:-मैत्रिणींनो आज विवाह इच्छुकांना खूषखबर मिळेल.गृहसौख्या चा दिवस.उंची वस्तू खरेदी कराल.पतीकडून एखादा दागिना भेट मिळू शकतो.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज मन प्रसन्न आणि उत्साहात असेल.सत्संग लाभेल.कामकाजात महिला सहकारी मार्फत लाभ होईल.प्रवासात काळजी घ्या.

धनु:-मैत्रिणींनो आज पंचमात चंद्र आहे. तरुणींचे विवाह जुळण्याची शक्यता.संतती इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.प्रेमात यश.

मकर:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. खर्च वाढेल.नात्यातून फारशी मदत मिळणार नाही.अपेक्षा भंग होईल.अर्थलाभ होईल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज ज्ञानलालसा वाढवणाऱ्या घटना घडतील.कलाकौशल्य दिसून येईल.भावंडाची साथ मिळेल.प्रसिद्धी लाभेल.
गैरसमज,चिडचिड टाळा.

मीन:-मैत्रिणींनो आज अपमानास्पद घटना घडतील.प्रवासात त्रास होऊ शकतो.मैत्रिणींशी भेटी होतील.गप्पा रंगतील.कलाकारांना सुसंधी मिळेल.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular