लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025. अश्विन शुक्ल दशमी
राहू काळ – दुपारी 1:30 ते 3
आज शुभ दिवस आहे” विजयादशमी, दसरा
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर आहे.
2 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चन्द्र आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
तुम्हाला मानव राहतं आणि प्रतिष्ठा यांची आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे तुम्ही वागता ,याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे स्वतंत्र विचार नाही परंतु दुसऱ्याचे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तुत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही समाजप्रिय आहात. नावीन्य व प्रवासाची आवड असते. तुम्ही हुशार ,तल्लख आणि शास्त्रीय गोष्टीची आवड असणारे असता. तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो .प्रेम ,सहानुभूती व आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुम्ही बोलण्यात आकर्षक व मोहकपणा असल्यामुळे इतर लोकांवर तुमची छाप पडते. मैत्रिणींच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करता.चांगले वाईट यातील फरक समजू शकतात .कल्पना व उत्साह यांचा संगम झाल्याने मोठमोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला आनंद वाटतो.स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमच्यात नम्रता असून आपली गुणवैशिष्ट्ये दुसऱ्याच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न करतात कायद्याचे पालन करणे आवडते .वयाच्या 38 व्या वर्षापासून आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होतात. तुम्ही खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करता. परंतु सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा तुम्हाला मिळतो .विवाह हा तुमच्या आवडीचा विषय असून लवकर लग्न करता. वैवाहिक जीवनात येणारे अडीअडचणींना शांतपणे तोंड देता .तुम्ही उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात .तुम्ही हुशार ,हरहुन्नरी ,कर्तुत्ववान असून पतीशी जुळवून घेता. तुमच्या लोकप्रियतेमुळे घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता.विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो. तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असता.
शुभ दिवस :- मंगळवार ,सोमवार ,शुक्रवार
शुभ रंग :- पांढरा ,पिवळा ,निळा.
शुभ रत्ने:- हिरा ,मोती .
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज सौख्याचा दिवस. मन प्रसन्न राहील.कामाच्या ठिकाणी मान मिळेल.कष्टाचे चीज होईल.पतीशी मतभेद होऊ शकतात. आरोग्य सुधारेल.
वृषभ:- मैत्रिणींनो आज सरकारी कामात यश मिळेल.स्वतंत्र वृत्ती दिसेल.मनातली भीती कमी होईल.पतीकडून मनातला हट्ट पुरवून घ्याल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज चन्द्र अष्टमात आहे.वाहन जपून चालवा.खर्च होईल. संतती कडे लक्ष द्या.महत्वाचे निर्णय पुढे ढकला.गुरुकृपेचा अनुभव येईल.
कर्क:-मैत्रिणींनो आज आनंदी दिवस आहे. कामकाजाच्या बाबतीत शाबासकी ची थाप मिळेल.प्रवास घडतील.पोटाचा त्रास जाणवू शकतो.खाण्याची पथ्य पाळा.पतीच्या तब्येतीची काळजी घ्या.
सिंह:- मैत्रिणींनो आज आरोग्य सुदृढ राहील.हितशत्रूं चा नाश होईल.स्पर्धेत यश मिळेल.सुवर्ण ,दागिने खरेदी होईल.
कन्या:- मैत्रिणींनो आज काही आनंदी घटना घडतील
कामात अडचणी उदभवतील. कामाचा थकवा जाणवेल.चिडचिड होऊ शकते.व्यायामाचे महत्व पटेल.
तुळ:-मैत्रिणींनो आज संमिश्र ग्रहमान आहे.काहींना स्पर्धेत बक्षीस मिळू शकते. आरोग्य जपा.पोटाचा त्रास होऊ शकतो. पती ची नाराजी राहील.विध्यर्थिनींना चांगले यश मिळू शकते.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज आवडत्या व्यक्ती ची भेट घडेल.एखाद्या समारंभात भाग घ्याल.राग टाळा.नवीन खरेदी होईल.पायाची काळजी घ्या.
धनु:-मैत्रिणींनो आज खर्च वाढेल.वास्तू विषयी कामे मार्गी लागतील.मुलांसाठी खरेदी होईल.काहींना प्रवासाचे योग. भावंडांची खुशाली कळेल.
मकर:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.शुभ समाचार मिळेल.विनाकारण कष्ट होऊ शकतात. नवीन ओळखी होतील. तूमचे अंदाज बरोबर ठरतील.
कुंभ:- मैत्रिणींनो आज तुमच्या व्यय स्थानी चन्द्र आहे. चिडचिड वाढेल.प्रवासाचा कंटाळा येइल. खर्च ही वाढेल.उगाच इतरांचा मत्सर वाटेल.परदेशी जाण्याच्या संधी चालून येतील.
मीन:- मैत्रिणींनो आज मस्त दिवस.भरभराट होईल.वैवाहिक जीवन आनंदी राहील.मनासारखी खरेदी होईल.मनस्वास्थ बिघडवणारी बातमी मिळू शकत