Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार मंगळवार, 23 सप्टेंबर 2025. अश्विन शुक्ल द्वितीया

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30

“आज उत्तम दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या.

23 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

 तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. महत्वकांक्षी असून कायदे पाळायला आवडते.शांतता प्रिय असून भोवताली भोगवादी लोकांचे जाळे असते."व्यवहारिक तसेच अध्यात्मिक दोन्ही गोष्टी ची जोड मिळते.संगीत,प्रवास तसेच साहित्य ची आवड असते. वरीष्ठ लोकांकडून मदत तसेच सरंक्षण मिळते.विरुद्धलिंगी व्यक्ती मध्ये लोकप्रियता मिळते.उत्तम शब्द कौशल्य असल्याने भाषणात, लेखनात, शिकवण्यात यश मिळते.मोठेपणा, प्रतिष्ठा, मान, परीक्षा या गोष्टींना अधिक महत्व देता. दुसऱ्याची परीक्षा झटकन करण्याचे ज्ञान उपजत असते.पैशाला जास्त महत्व देता.आर्थिक स्थिरता मिळवण्याची महत्वाकांक्षा असते.गोडवा बोलण्यात असल्याने वसूली लवकर होते.पैशाच्या बाबतीत नशीबवान असता. तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मैत्रिणीना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते.

तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असता. पतीशी जुळवून घेण्यात तरबेज असता. तुम्ही आरोग्याने सुदृढ असून, रूढी बद्दल आयुष्य तुम्हाला आवडत नाही. स्वभावाने नम्र असतात. पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरातली टापटीप,व्यवस्थित पणा ठेवणायची कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात वाकबगार असता.
वाचनाची आवड असून वक्तृत्व ,ज्ञान ,बौद्धिक बैठक आहे ,कला, प्रवास यांचे आवड आहे ,अशा लोकांकडे जाणे येणे तुम्हाला आवडते.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशीभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज कामाचा तणाव राहील. मन अशांत राहील.उत्साहित असाल.वजनवाढी वर नियंत्रण ठेवा.

वृषभ:- मैत्रिणींनो आज विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. प्रेमीकाना यश मिळेल. प्रसिद्धी लाभेल.मौल्यवान वस्तू खरेदीची शक्यता. परदेशी प्रवासाचे बेत आखाल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज गृह सजावट कराल. घरात मोठे बदल कराल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.ऑनलाईन पैशाची देवघेव करताना सावध रहा.

कर्क:-मैत्रिणींनो आज देवधर्मासाठी खर्च कराल.नेहमीच्या पेक्षा वेगळा विचार कराल.कुटुंबाची साथ मिळेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज सत्संग लाभेल.सद्गुरूंची कृपा होईल.ऐहिक आणि पारलौकिक यात मन द्विधा राहील.

कन्या:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चंद्र गुरू युती आहे. मन आनंदी राहील.धर्माच्या साठी खर्च कराल. आत्मविश्वास वाढेल. बौध्दिक चातुर्याने लाभ होईल.

तुळ:-मैत्रिणींनो आज मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाटेल.परदेशी प्रवास करावा असे वाटेल.कुलदेवतेची पूजा बळ देईल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.प्रतिष्ठा राखण्यासाठी खर्च होईल.रागला आवर घाला,नुकसान होऊ शकते.

धनु:-मैत्रिणींनो आज कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल.कामात मग्न रहाल. सहकाऱ्यांचे वर्चस्व वाढेल.

मकर:- मैत्रिणींनो आज मानसिक आरोग्य संभाळा.प्रवास होईल.नियोजन बदलेल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज अकारण अस्वस्थता वाटेल.संततिच्या विषयी काळजी वाटेल.कटू अनुभव येऊ शकतात.अचानक खर्च करावा लागेल.

मीन:- मैत्रिणींनो आज घरगूती कामात लक्ष घालावे लागेल.पतीच मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.वास्तू विषयक कामे रेंनगळती

RELATED ARTICLES

Most Popular