Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

रविवार, 21 सप्टेंबर 2025. भाद्रपद अमावस्या

राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

आज वर्ज्य दिवस आहे” सर्वपित्री अमावास्या
सूर्य ग्रहण
भारतात न दिसणार असल्याने पाळू नये.
आज जन्मलेल्या बाळाची रास सिंह/दुपारी 3:58 नंतर कन्या.(चतुष्पाद, नाग करण शांती)
आजची टीप:-संध्याकाळी एका मातीच्या पणती मध्ये थोडे तांदूळ घेऊन त्या वर कपूर जाळवा.घरातील निगेटिव्ह शक्ती जाते.

21 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे.

तुम्ही प्रेमळ असून मुलांबद्दल विशेष प्रेम असते. तुमच्या उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते .तुमच्याकडे लोकांना आकर्षून घेण्याची शक्ती असते .सर्व प्रकारांच्या लोकांमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला वाटा मिळतो .तुमच्यात आत्मविश्वास असून इतरांना योग्य सल्ला देता .आयुष्यात प्रसिद्धी व मानमरातब उशिरा मिळते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.
तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात. घराबद्दल आपलेपणा असतो, पण ओढ नसते. तुमची इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो परंतु कोणत्याही एका विषयात तुम्ही पारंगत होत नाही .स्वभाव लहरी असून मनाने हळवे असतात. पतीला सर्वतोपरी साथ देता आणि त्याच्या तुम्हाला अभिमान वाटतो .तुम्ही प्रेमळ, निष्ठावान असून उत्तम सह धर्मचारिणी असतात. चाणाक्ष व धूर्त स्वभावामुळे नोकरी धंद्यामध्ये यश मिळते. स्वतःच्या कष्टाचा मोबदला चांगल्या रीतीने मिळवता. पैशामुळे जेवढी सुखी मिळवता येतील त्या सर्वांचा तुम्ही आनंद लुटता.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज संतती कडून चांगली बातमी मिळेल.दुपारनंतर मात्र मन अस्वस्थ राहील.सूर्यग्रहण तुमच्या षष्ठ स्थानी आहे ,आरोग्य सांभाळा.

वृषभ:- मैत्रिणींनो आज मोठी जोखीम नको.पैशाची देवघेव करताना काळजी घ्या.दानधर्म करा.गर्भवतींनो काळजी घ्या.

मिथुन:- मैत्रिणींनो आज मस्त दिवस आहे. कामाचा वेग वाढेल.मैत्र मंडळींशी गप्पा होतील. घरात मतभेद होऊ शकतात. दुपारनंतर न आवडणारी कामे करावी लागतील.

कर्क:-मैत्रिणींनो आज धार्मिक कामासाठी खर्च करावा लागेल.कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल.मोजके बोला.

सिंह:- मैत्रिणींनो आज धार्मिक कामात व्यस्त रहाल.स्वाभिमान जपाल.दुपारनंतर मात्र आरामाची गरज वाटेल.इच्छा असो नसो धार्मिक कार्यात सहभाग घ्यावा लागेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज सूर्य ग्रहण तुमच्याच राशीत आहे.महत्वाचे कामे आज नकोत.वाद टाळा.प्रवास त्रासदायक ठरू शकतो.

तुळ:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. धार्मिक कार्यासाठी दानधर्म कराल.काही सुखद घटना घडतील.यंत्रसामुग्री हाताळताना काळजी घ्या.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.झटपट कामाला।लागा.वेळ दवडु नका.दिवस दगदगीचा आणि धावपळीत जाणारा.राजकिय क्षेत्रात काम करणारे एखादा अनपेक्षित निर्णय होईल.

धनु:-मैत्रिणींनो आज सुट्टी असली तरीही कामात व्यस्त रहाल.पतीची मर्जी सांभाळावी लागेल.मात्र कनिष्ठ सहकार्य करतील.

मकर:- मैत्रिणींनो आज मानसिक ओढताण होईल.मोह टाळा.वाहन काळजीपूर्वक चालवा.

कुंभ:- मैत्रिणींनो आज सूर्यग्रहण तुमच्या अष्टमात होणार आहे.आरोग्य संभाळा.मानसिक स्वास्थ्य जपा.जप,मंत्र घेणं या काळात उत्तम ठरेल.

मीन:- मैत्रिणींनो आज अकारण शत्रुत्व नको.पतीशी मतभेद टाळा.गैरसमज टाळ

RELATED ARTICLES

Most Popular