लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025. भाद्रपद कृष्ण त्रयोदशी.
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12
आज वर्ज्य दिवस,त्रयोदशी श्राद्ध.प्रदोष.
आज जन्मलेल्या बाळाची रास-कर्क /सकाळी 7:06 नंतर सिंह
नक्षत्र गंडात.
आजची टीप:-संध्याकाळी दिवाबत्ती करताना एक दालचिनी आणि कापूर देवाजवळ जाळला तर आर्थिक लाभ होतात.
19 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचाजन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुमच्यात एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मात्र तुम्हाला संशोधन करण्याची आवड असते. तुमचं स्वभाव तापट आणि हेकट असू शकतो. स्वभाव उतावळा असल्याने प्रेमप्रकरणात अपयश येऊ शकते. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा मिळतात. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव धडपड्या, बढाईखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे.
शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.
शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. आवडत्या व्यक्ती च्या आनंदासाठी खर्च कराल
मनाप्रमाणे गोष्टी घडतील. विवाह जुळतील.प्रेमीकाना यश.
वृषभ:- मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. पर्स भरलेली राहील.घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल.उधारी वसूल होईल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज मन आनंदी राहील.तुमच्या हजरजबाबी आणि मिश्किल वृत्ती आज प्रखरतेने दिसेल.काहींना मत्सर वाटेल
श्री मारुती उपसना अडचणींवर तोडगा ठरेल.
कर्क:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल.सवंगड्याकडून भेटवस्तू मिळू शकेल.
सिंह:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत सकाळी 8 नंतर चंद्र आहे. मन प्रसन्न राहील.भावंड एखादी भेटवस्तू देतील.भटकंती होईल.स्वतःसाठी खरेदी होईल.
कन्या:- मैत्रिणींनो आज चन्द्र व्यय स्थानी आहे.काहीसा तणाव जाणवेल.खर्च वाढला तरी कमाई चांगली राहील.
तुळ:-मैत्रिणींनो आज सर्वार्थाने उत्तम दिवस.मनासारखा जाणारा.मैत्रिणीसोबत छान वेळ व्यतीत कराल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.वाहन मात्र काळजीपूर्वक चालवा.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज कामात सहकार्य मिळेल.खर्च ही वाढेल.कामानिमित्त भटकंती होईल.
धनु:-मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. घरगुती धार्मिक कार्यक्रम होतील. आवडता छंद जोपासाल. वाहन सौख्याचा दिवस.नातेवाईकांशी भेट घडेल.
मकर:- मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील. मात्र जास्त मेहनत करावी लागेल.गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा.
कुंभ:- मैत्रिणींनो आज पतीची मर्जी सांभाळावी लागेल.खर्च होईल.कामात अपेक्षित यश मिळणार नाही.
मीन:- मैत्रिणींनो आज षष्ठात चन्द्र आहे.महिलांच्या मार्फत लाभ होतील. व्यवसाय वाढेल.अकारण शत्रुत्व ओढवून घेऊ नका.स्तुती प्रियता टाळ