Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

बुधवार, 17सप्टेंबर 2025*. भाद्रपद कृष्ण एकादशी

राहू काळ – दुपारी 12 ते 1:30

आज उत्तम दिवस आहे. इंदिरा एकादशी
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क असून
परिघ योग शांती करून घेणे.

17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे ध्येय व महत्वकांक्षा उच्च असतात. धर्माबद्दल व रुढि बद्दल चमत्कारी कल्पना असतात. ठराविक चाकोरीतून जाणे आवडत नाही .तुमचे विचार क्रियाशील व विधायक असतात. तुम्ही उत्कृष्ट संघटक असतात .तुम्ही शांतता प्रिय असून लोक कल्याणासाठी प्रयत्न करतात .व्यक्तिमत्व प्रभावी असून धाडसी व स्वाभिमानी असतात .संशोधन ज्ञान याकडे ओढा असतो. गुडविद्या व हिप्नॉटिझम अशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात. तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो .घरातील लोकांना सांभाळून घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करता. समाजप्रियतेमुळे घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. घर कामाचा कंटाळा असतो.दुसऱ्यांकडून कामे करून घेणं हुशार असतात. खास करून कोणत्याही रूढीला बांधून घेणे तुम्हाला पसंत नसते. ऐशोआरामी जीवनाकडे ओढ असते. घरात टापटीत व्यवस्थितपणा याकडे लक्ष पुरवता.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.

शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज चतुर्थ स्थानी चंद्र आहे. मन आनंदी राहील. कुटुंबातील वातावरण शांत राहील.अध्यत्मात रममाण व्हाल.लांबचे नातेवाईक भेटतील.रियल इस्टेट व्यवसायात अचानक लाभ होतील.

वृषभ:- मैत्रिणींनो आज तृतीय स्थानी चन्द्र आहे.भावंडांच्या कडून लाभ होतील.नवनवीन कल्पना सुचतील.मन आनंदी राहील.

मिथुन:- मैत्रिणींनो आज द्वितीयात चन्द्र आहे.आवडत्या वस्तू खरेदी कराल.कामाच्या ठिकाणी छान अनुभव येतील.
बोलण्याने मन जिंकून घ्याल.

कर्क:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.आनंदी दिवस.धार्मिक यात्रा घडतील.अनपेक्षित अनुभव येतील.सत्संग घडेल.
अचानक लाभ होतील.

सिंह:- मैत्रिणींनो आज चन्द्र व्यय स्थानी आहे.आर्थिक लाभ वाढेल,पण देणी पण वाढतील.सामजिक कामात रस वाटेल.मोजके बोला

कन्या:- मैत्रिणींनो आज लाभात चन्द्र आहे.प्रसन्न दिवस .मनोरंजनाकडे कल राहील.पतीसोबत एखादी छोटी सहल घडेल.कोडी उलगडतील.अचानक लाभ होतील.

तुळ:-मैत्रिणींनो आज दशमात चन्द्र आहे.कामात व्यस्त रहाल.प्रवास घडेल.भीती दूर होईल.कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.

वृश्चिक:-मैत्रिणींनो आज धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. कामाचे नियोजनात अचानक।बदल घडेल.नेहमीच्या पेक्षा हटके कामे होतील.

धनु:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. भेटीगाठी होतील.मन शांत ठेवा. वाहन काळजीपूर्वक चालवा.

मकर:- मैत्रिणींनो आज तुमचे अंदाज बरोबर ठरतील.एखादी टिप्पणी प्रसिद्धी देईल.नावलौकिक वाढेल.पतीकडून लाभ होतील.

कुंभ:- मैत्रिणींनो आज शत्रूंवर विजय मिळेल.राग टाळा.सामजिक कामात वेळ जाइल.प्राण्यांच्या पासून काळजी घ्या.

मीन:- मैत्रिणींनो आज मन आनंदीत करणारे ग्रहमान आहे.तुमची प्रशंसा होईल. तत्वाने वागल्याचा प्रयत्न कराल. धाडसी निर्णय घ्याल.चीजवस्तू संभाळा.

RELATED ARTICLES

Most Popular