Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वांर

सोमवार, 15 सप्टेंबर 2025. भाद्रपद कृष्ण नवमी

राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9

आज व्यतिपात, वर्ज दिवस आहे” अविधवा नवमी
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन
आज जन्मलेल्या बाळाची व्यतिपात योग शांती करून घेणे

15 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे.
तुम्ही मोठेपणा, प्रतिष्ठा व मान या गोष्टींना जास्त महत्त्व देता.तुम्ही धारिष्ट वान असून दिमाख असतो .वक्तृत्व कला असून दुसऱ्या छाप पाडता. कोणत्या गोष्टीत झटपट निर्णय घेतात. तुमची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती उत्तम असते .तुम्ही स्वतंत्र विचारांचे व कृतीचे असा जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे वाटते, त्यामुळे बरेच चढउतार होतात. तुम्ही उद्योग प्रिय असून सतत कामात मग्न राहतात. व्यावहारिक जीवनाबरोबरच गुढ गोष्टींचे आकर्षण असते .संशोधन करण्याची वृत्ती असून आशावादी असतात .कोडी सोडवण्याचा छंद असतो. घर संसार, मित्रमैत्रिणी यांच्या बद्दल आपुलकीचे नाते जोडली जातात आणि ती तुम्ही शेवटपर्यंत निभावता .तुम्ही जन्मताच कलाकार व कलाप्रिय असता. तुम्ही तुमच्या कलेचा धूर्तपणे व व्यावसायिक दृष्ट्या वापर करतात .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असून ती त्याचा पुरेपूर व्यवसायात वापर करता. तुमच्या सहवास इतरांना सुखावह होतो. सामाजिक रूढी व बंधनांना तुम्ही वाटा देता. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे कल असतो. संभाषण कलेत प्रवीण असता.जीवनात अधिकार व मान मिळतो .आयुष्य आरामदायक व सुखभोग घेण्याकडे कल असतो. सुगंधी द्रव्य ,आकर्षक कपडे यांचे तुम्ही शौकीन असता. अनपेक्षित पणे पैसा मिळतो ,परंतु बचत करण्याची प्रवृत्ती नसते. केलेल्या कष्टाचे चीज होते .तुमची आर्थिक बाजू समाधानकारक असते. तुम्ही आरोग्याने सुदृढ असता. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. पण तिला योग्य ती साथ तुम्ही देता. घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. एक निष्ठावान जबाबदारी व पत्नी म्हणून तुम्ही मान्यता पावता. जे लोक आकर्षक ,बुद्धिमान, विचारवंत धडाडीचे, कलेवर प्रेम असलेले आहेत अशा अशांकडे तुम्ही आकर्षले जातात.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज मन प्रसन्न राहील.मनासारखे यश मिळेल.अडचणी दूर होतील.

वृषभ:- मैत्रिणींनो आज अनपेक्षित आनंददायी घटना घडेल.सत्संग घडेल. मेजवानी मिळेल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. दानधर्म करा. मिष्टान्न भोजनाचा लाभ घ्याल.कौटुंबिक सुख लाभेल.

कर्क:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील.मनसोक्त खर्च कराल.दानधर्म कराल.

सिंह:- मैत्रिणींनो आज चन्द्र लाभस्थानी आहे. कामात प्रगती होईल. प्रसिद्धी, लाभ मिळेल. मौल्यवान वस्तू जपा.पाण्याजवळ वावरताना काळजी घ्या.

कन्या:- मैत्रिणींनो आज छान दिवस आहे.धार्मिक कामात सहभागी व्हाल.पतीचा आपल्याविषयी गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.

तुळ:-मैत्रिणींनो आज बरेवाईट अनुभव जमा होतील.घरगुती कामात व्यस्त रहाल.सर्दी पडसे ,जुनी दुखणी डोके वर काढतील.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज जेष्ठ व्यक्ती चा सल्ला मानणे हिताचे आहे.कटू बोलण्याने दुखवू नका.नाती जपा.

धनु:-मैत्रिणींनो आज पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.आरोग्य जपा,दगदग टाळा.गवताच्या जवळ चालताना सावधगिरी बाळगा.

मकर:- मैत्रिणींनो आज घरातल्या इंटेरिअर मध्ये बदल कराल.सामाजिक कार्यात आनंद मिळेल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज आरोग्य सुधारेल. झटपट कामाला लागा.संध्याकाळी पतीसोबत छान भटकंती होईल.पर्स भरलेली राहील.

मीन:- मैत्रिणींनो आज मन अस्वस्थ राहील.सार्वजनिक कामात भाग घ्याल.बंडखोरी उफाळून येईल.घरगुती कामे निकाली काढाल.

RELATED ARTICLES

Most Popular