Homeईपेपरपवन चव्हाण यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट दयानंद आडे.

पवन चव्हाण यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट दयानंद आडे.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 14 /9/2025 मा.राज्य मंत्री इंद्रनील नाईका सह बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी पवन चव्हाण यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनापर भेट .
उमरगा:-हैदराबाद ग्याजेट नुसार बंजारा समाजास अनुसूचित जमात प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी उमरगा येथील पवन चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली या दुःखद घटनेतून कुटुंबीयांना सावरण्यासाठी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब सह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूरावजी राठोड यांनी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला त्याचबरोबर समाजाच्या वतीने व शासकीय स्तरावर जी काही मदत करता येईल ती केली जाईल असे आश्वासित केले यावेळी उमरगा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी साहेब, सुरेश बिराजदार ,लातूर मनसे जिल्हाध्यक्ष तथा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड ,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण , हरी जाधव, वैभव जाधव, सचिन राठोड ,नाईक नगर तांडा सरपंच योगेश राठोड सह मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular