विचार क्रांती न्यूज – ईपेपर
दिनांक: 14 जुलै 2026 | मंगळवार | वर्ष: 2| अंक: 195 | पाने: 6
संपादक: अंबादास वसंतराव देशमुख
संपर्क: 9850579876 | ईमेल: [email protected]
पान 1: मुखपृष्ठ – ठळक बातम्या
- उदगीर शहरात वाहतुकीची कोंडी – शिवाजी चौक, देगलूर रोड, उमा चौक येथे तासनतास ट्रॅफिक. नागरिक हैराण.
- पावसाअभावी खरीप पिके संकटात – 15 दिवसांपासून पाऊस नाही. पेरणी केलेली पिके करपली.
- उदगीर-देगलूर बस टाकळी येथे थांबत नाही – विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना 3 3 तास वाट लागते.
पान 4: महिला आणि समाज
समाजसेवेची मूर्ती: अंगणवाडी सेविका सौ. प्रज्ञा अंबादास देशमुख
ग्रामीण भागातील लहान मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे अंगणवाडी. आणि या अंगणवाडीचा पाया मजबूत करणाऱ्या आहेत आमच्या सौ. प्रज्ञा अंबादास देशमुख.
कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ती
सौ. प्रज्ञा देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत. दररोज वेळेत अंगणवाडी उघडणे, मुलांना पोषण आहार देणे, लसीकरणाची माहिती देणे आणि मातांना मार्गदर्शन करणे – हे सर्व काम त्या अतिशय आपुलकीने करतात.
बालकांच्या भविष्याच्या शिल्पकार
0 ते 6 वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अहोरात्र मेहनत घेतात. कुपोषण दूर करण्यासाठी पोषण आहार आणि आरोग्य तपासणीवर त्यांचा विशेष भर असतो.
“अंगणवाडी म्हणजे माझं दुसरं घर आहे” – असे त्या नेहमी म्हणतात. समाजाकडून कौतुक.
पान 5: संपादकीय
माणुसकीचा अंत: गरिबाचा टाहो अन् श्रीमंतांचा आंधळेपणा
लेखक: लक्ष्मण राजेंद्र पवार
रा. टाकळी, ता. उदगीर, जि. लातूर | मोबाईल क्र. ९१३०१२९०३
“ज्या देशात अन्नाचा कण पिकवणारा राजा उघड्यावर पडलाय, तिथे माणुसकीचा जिवंतपणीच अंत झाला आहे! श्रीमंतीच्या माजात आणि सत्तेच्या खेळात मश्गूल असणाऱ्यांनो, निसर्गाचा हा असा चाबूक आहे की, तुमच्याकडे बँका भरून पैसा असेल, पण खाण्यासाठी तोंडात जिभेची चव आणि पोटात पचवायची ताकद उरणार नाही!”
आज खऱ्या अर्थाने या देशातून माणुसकी संपली आहे. ज्या मातीने प्रत्येकाला जगवलं, त्याच मातीच्या लेकाची—शेतकऱ्याची दयनावस्था आज कोणालाच बघवत नाही.
गेल्या वर्षी महापुराने मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत तांडव केलं… आणि यंदा कोरड्या दुष्काळाने उभं पीक डोळ्यांदेखत जाळून खाक केलं.
पण ही वेदना एसी बंगल्यात बसणाऱ्या बड्या नेत्यांना कधीच दिसली नाही.