लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर रामदास शिवराज पाटील सुमठानकर हे प्रशासकीय सेवेत Ceo म्हणून हिंगोली. असेल नांदेड .देगलुर असेल येथे त्यांनी आपली सेवा बजावली त्या सेवेमध्ये जनसामान्यात एक चांगला अधिकारी म्हणून यांनी आपले नाव नोकरीत लौकिक केले. भारतीय जनता पक्षाचे दहा वर्ष सक्रिय काम केले. परंतु ते शाहू फुले आंबेडकर या विचाराच्या असल्यामुळे त्यांचे तेथे मन लागेना असे झाले. म्हणून त्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश करून कामाला सुरुवात केली. त्यांना काँग्रेसने नांदेड विधान परिषद ची उमेदवारी देऊन रामाचा वनवास संपला असे म्हणला काही हरकत नाही. सुमठाणा हे गाव उदगीर तालुक्यातील असून एक छोटेसे गाव आहे. याच गावातील बाबुराव धर्माजी आंबेगावे या कार्यकर्त्याने सर्वसाधारण सरपंच पद असताना स्वतः मागासवर्गीय असून सर्वसाधारण जागेवर सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. बाबुराव आंबेगाव हे पंचायत समिती असो. जिल्हा परिषद असो . बाजार समिती असो. कुठल्या निवडणुकीला सामोरे जाणारा चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याची ऊर्जा घेऊन श्री रामदास पाटील यांनी समाजसेवेमध्ये स्वतःला प्रशासकीय अधिकारी असताना राजीनामा देऊन समाजसेवा करण्याचे ठरवले. सुमठाणा येथील मातीमध्ये एक वेगळीच उर्जा आहे म्हणून श्री रामदास शिवराज पाटील अशा सभ्य सुसंस्कृत समाज सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन एक वेगळाच पायंडा घातले आहे. नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारचा जिल्हा असल्यामुळे बरेचसे हितसंबंध व्यवहार या दोन्ही जिल्ह्याचे चांगले आहेत .त्यामुळे या उमेदवारीचा फायदा श्री रामदास पाटील सुमठानकर यांना होणार यात शंका नाही. रामाचा वनवास काँग्रेस पक्षाने संपवला असे म्हणायला काही चुकीचे ठरणार नाही. रामदास पाटील यांच्या उमेदवारीचा आनंदोत्सव उदगीर तालुक्यांमध्ये देगलूर मुखेड जिथे यांचे मित्र नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.